शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

गोमंतकीयांना पोर्तुगीज संबोधणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 19:23 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरव्यवस्थापकाला आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते.

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाने दिल्लीहून पाठवले होते. तो रेल्वेचा अ‍ॅम्बेसिडर असल्याचे आमदार साल्ढाणा यांनी पत्रकारांना सांगितले. तुम्ही लोक पोर्तुगीज आहात असे विधान अधिकाऱ्याने कुठ्ठाळीतील लोकांविषयी केले होते, अशी अ‍ॅलिनाची तक्रार होती.

पणजी : तुम्ही लोक पोर्तुगीज आहात अशा प्रकारचे वक्तव्य हुबळीला बसणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या एका सरव्यवस्थापकाने केले होते. भाजपच्या आमदार अ‍ॅलिना साल्ढाणा यांनी यास तीव्र आक्षेप घेतला. हा विषय केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर गुरुवारी संबंधित सरव्यवस्थापकाने अ‍ॅलिना यांच्यासमोर जाहीर माफी मागितली. आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे हा अधिकारी म्हणाला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरव्यवस्थापकाला आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. त्यानुसार अधिकारी गुरुवारी बंगल्यावर आला. मुख्यमंत्री मंगळवारी केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासोबतही बोलले होते. सरव्यवस्थापकाने माफी मागितली नाही तर त्याची बदली करूया, असे सरकारी पातळीवर ठरले होते. सरव्यवस्थापक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हजर झाले तेव्हा त्यांच्यासोबत रेल्वेचा अन्य एक वरिष्ठ अधिकारी हजर होता. 

त्यास रेल्वे मंत्रालयाने दिल्लीहून पाठवले होते. तो रेल्वेचा अ‍ॅम्बेसिडर असल्याचे आमदार साल्ढाणा यांनी पत्रकारांना सांगितले. कुठ्ठाळीतील अनेक लोकांना घेऊनच साल्ढाणा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आल्या होत्या. तुम्ही लोक पोर्तुगीज आहात असे विधान अधिकाऱ्याने कुठ्ठाळीतील लोकांविषयी केले होते, अशी अ‍ॅलिनाची तक्रार होती. अशा प्रकारची भाषा करणे योग्य नव्हे, असे मुख्यमंत्र्यांनी सरव्यवस्थापकाला सांगितले. आपण गैरहेतूने बोललो नव्हतो, आपल्या तोंडून चुकून तसे शब्द आले. आपली मातृभाषा हिंदी आहे. पण इंग्रजीतून बोलताना आपली वाक्यरचना चुकली, आपण त्याविषयी माफी मागतो व माझे शब्द मागे घेतो, असे सरव्यवस्थापकाने नंतर पत्रकारांपाशी जाहीर केले.

आम्ही यापुढे कधीच या रेल्वे अधिकाऱ्यासोबत कोणत्याच विषयाबाबत चर्चा करणार नाही. त्याने हुबळीचेच काम पहावे, गोव्यातील रेल्वे काम पाहू नये, असे साल्ढाणा म्हणाल्या. गोवा हा भारताचा भाग आहे. रेल्वे अधिकाऱ्याने गोमंतकीयांचा अपमान केला, असे साल्ढाणा म्हणाल्या.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे