पुण्यातील युवकाची पणजीत आत्महत्या
By Admin | Updated: February 27, 2017 21:25 IST2017-02-27T20:59:27+5:302017-02-27T21:25:32+5:30
पुणे येथून गोव्यात आलेल्या संग्राम वचकल नामक पर्यटकाने पणजी येथील हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. २२ वर्षीय संग्राम हा चार दिवसांपूर्वीच

पुण्यातील युवकाची पणजीत आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - पुणे येथून गोव्यात आलेल्या संग्राम वचकल नामक पर्यटकाने पणजी येथील हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. २२ वर्षीय संग्राम हा चार दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. पणजी येथील टुरिस्ट हॉटेलमध्ये तो थांबला होता. रविवारी तो कुठे होता याची कल्पना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना नव्हती; परंतु सोमवारी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. रूम सर्व्हिससाठी दरवाजा उघडला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा त्याचा मृतदेह गळफासाला लटकताना दिसला. पंख्याच्या शेजारी असलेल्या एका हुकाला कपड्याचा गळफास करून त्याने हे कृत्य केले होते. मृतदेह अत्यंत सडलेला होता. संग्राम हा पुण्यातून १४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता, अशी माहिती पुणे पोलिसांकडून पणजी पोलिसांना मिळाली आहे. पुण्यातील ओसीसी बिझनेस, वीर सावतामाळी मंदिर, पुरंदर असा त्याचा पत्ता आहे. त्याच्या मृत्यूची माहिती योग्य माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांना कळविल्याची माहिती पणजी पोलिसांकडून देण्यात आली. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे.