आरोग्य खात्यातर्फे जनजागृती कार्यशाळा
By Admin | Updated: May 7, 2014 01:01 IST2014-05-06T16:46:18+5:302014-05-07T01:01:28+5:30
म्हापसा : डेग्यू रूग्णांचे वाढत असलेल्या प्रमाणावर चिंतीत झालेल्या आरोग्य खात्याने आपली कंबर कसताना राज्यभरातील सरकारी खाते, स्वराज्य संस्था आणि समाजसेवी प्रतिनिधींसोबत जनजागृती कार्यशाळा घेतली.

आरोग्य खात्यातर्फे जनजागृती कार्यशाळा
म्हापसा : डेग्यू रूग्णांचे वाढत असलेल्या प्रमाणावर चिंतीत झालेल्या आरोग्य खात्याने आपली कंबर कसताना राज्यभरातील सरकारी खाते, स्वराज्य संस्था आणि समाजसेवी प्रतिनिधींसोबत जनजागृती कार्यशाळा घेतली.
राज्यस्तरीय जलद कृती दल समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संसर्गजन्य रोगांचा प्रादूभार्वाबाबत खंबीर पावले उचलण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षपद भूषविलेल्या आरोग्य खात्याचे प्रमुख सचिव परिमल राय यांनी राज्य सरकारच्या विविध सरकारी खात्याच्या अधिकार्यांना डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य रोगांविरूद्ध लढा देण्यासाठी तयारी करण्याचा आदेश दिला. यात आपल्या प्रभावाखालील असलेल्या क्षेत्रात डासांची संख्या वाढण्याजोग्या जागांचा शोध घेण्याचा आणि त्यावर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीत सरकारच्या विविध खात्यासह शिक्षण, पंचायत, पालिका सार्वजनिक बांधकाम खाते, महामंडळे, नगरनियोजन खाते तसेच उद्योग आणि समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी डॉ. जोस डिसा यांनी कोणती काळजी घ्यावी यासंबंधी महत्वाच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)