कूळ-मुंडकार प्रकरणी आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: July 17, 2015 03:48 IST2015-07-17T03:48:24+5:302015-07-17T03:48:41+5:30
पणजी : कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती येत्या विधानसभा अधिवेशनात मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला

कूळ-मुंडकार प्रकरणी आंदोलनाचा इशारा
पणजी : कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती येत्या विधानसभा अधिवेशनात मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला
आहे. काँग्रेसचे महासचिव यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कुळांना व मुंडकारांना न्यायालयाची वाट दाखविणाऱ्या या कायद्यातील दुरुस्ती ताबडतोब रद्द करण्यात याव्यात आणि मुख्य करून सनसेटचे कलम रद्द करण्यात यावे, असे नाईक यांनी म्हटले आहे. येत्या गोवा विधानसभा अधिवेशनात या संबंधी दुरुस्ती विधेयक आणले जावे व करण्यात आलेल्या दुरुस्ती रद्द करण्यात याव्यात. अन्यथा काँग्रेस पक्ष या प्रकरणात मोठे आंदोलन छेडणार आहे. येत्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदारही या प्रकरणात सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील भाजप सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जाचक भूमी अधिग्रहण विधेयक आणले आहे आणि राज्य सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात अन्यायकारक दुरुस्ती केल्या आहेत. भूमी अधिग्रहण विधेयकामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दावा हा शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची टीका नाईक यांनी केली. युपीए राजवटीत सरकारने भूमि अधिग्रहणासंदर्भात पुनर्वसन, भरपाई, पारदर्शकता आणणारी दुरुस्ती केली होती व
तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्याला पाठिंबा दिला होता. आता हीच भाजपा सत्तेवर आल्यानंतर युपीएचा कायदा चुकीचा असल्याचे सांगत असल्याचे ते म्हणाले.