काही टुरिस्ट गाईड बनले वेश्या दलाल
By Admin | Updated: July 20, 2015 01:13 IST2015-07-20T01:13:13+5:302015-07-20T01:13:27+5:30
गोव्यातील काही टुरिस्ट गाईड हे एस्कॉर्ट वेश्या व्यवसायातील २५ टक्के दलालीचे भागीदार बनल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शनिवारी (दि.१८) रात्री गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या

काही टुरिस्ट गाईड बनले वेश्या दलाल
वासुदेव पागी ल्ल पणजी
गोव्यातील काही टुरिस्ट गाईड हे एस्कॉर्ट वेश्या व्यवसायातील २५ टक्के दलालीचे भागीदार बनल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शनिवारी (दि.१८) रात्री गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या कारवाईत हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. या प्रकरणात काही टुरिस्ट गाईडना अटक होण्याची शक्यताही आहे.
हे टुरिस्ट गाईड गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची वेश्या व्यवसायातील दलालांशी भेट घालून देतात. त्यानंतर ठराविक रक्कम देण्याच्या हमीवर त्यांना ठराविक जागेवर युवती पुरविली जाते. त्या ठिकाणी युवतीसह असलेल्या दुसऱ्या दलालाला ही रक्कम दिली जाते व युवतीला घेऊन पर्यटक जातात. या कामात गिऱ्हाईकाने दिलेल्या रकमेतून युवती व दलालांना दलाली ही मिळतेच; परंतु टुरिस्ट गाईडलाही चांगली दलाली दिली जाते. काही टुरिस्ट गाईड हे वेश्या दलालांसाठी काम करतात, तर काही वेश्या दलाल टुरिस्ट गाईड बनून दलाली करीत असतात, अशी माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली. स्वत:ला टुरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱ्या आणि प्रत्यक्ष पर्यटकांना दलालांकडे नेणाऱ्या काही संशयितांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. अटक केलेल्या दलालांशी या तथाकथित गाईडची चांगली ओळख आहे व त्यांचे आपसात व्यवहारही आहेत. स्पामध्ये एका पर्यटकाला या गाईडने आणले तर त्या स्पामधून त्याला १ हजार रुपये दलाली दिली जाते.
एस्कॉर्ट वेश्या व्यवसायात ही दलाली २० ते २५ टक्के आहे. येत्या काही दिवसांत त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.