शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

गोव्यात कॅसिनोंसाठी जेटींचे शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 11:22 IST

मांडवी नदीत सध्या पाच कॅसिनो जहाजे आहेत. या कॅसिनोंकडून रोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल केली जाते.

पणजी : राज्यातील कॅसिनो जहाजांकडून सरकारी जेटींचा वापर केला जातो. या जेटींसाठी कॅसिनो व्यवसायिकांना लागू असलेले शुल्क वाढविण्याचा बंदर कप्तान खात्याचा विचार आहे. त्याविषयीचा प्रस्ताव आपण लवकरच मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.मांडवी नदीत सध्या पाच कॅसिनो जहाजे आहेत. या कॅसिनोंकडून रोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल केली जाते. सरकारी तिजोरीत तुलनेते कमीच महसुल जातो. गोमंतकीयांना या कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बंदीची अंमलबजावणी दि. 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल. मंत्री लोबो यांनी नुकतीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. सरकारच्या तिजोरीत जास्त निधी नाही व त्यामुळे अनेक विकास प्रकल्पांनाही फटका बसतो. या पाश्र्वभूमीवर राज्यात महसुल वाढीसाठी नवे मार्ग सरकारने शोधायला हवेत व नव्या पद्धतीने ज्यादा महसुल सरकारी तिजोरीत यावा म्हणून काय करता येईल यासंबंधी लोबो यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडेच अर्थ खाते आहे. लोबो यांनी महसुल प्राप्तीचे काही नवे मार्ग मुख्यमंत्र्यांना सूचविले. केंद्र सरकारने अजून तरी गोव्याला कोणतेही मोठे आर्थिक पॅकेज दिलेले नाही.

लोकमतने लोबो यांना जेटींविषयी विचारले असता, ते म्हणाले की जेटींचा वापर कॅसिनो करत असल्याने सरकारच्या तिजोरीत थोडा जास्त शूल्क यायला हवा. त्यासाठीच जेटींच्या वापराचे शूल्क सर्वच प्रकारच्या जहाजांसाठी वाढविले जाईल. आपण लवकरच त्यासाठीच्या फाईलवर प्रक्रिया सुरू करीन.दरम्यान, वाणिज्य कर आयुक्त दीपक बांदेकर यांना सरकारने गेमिंग कमिशनर म्हणून नियुक्त करावे असे ठरले आहे. बांदेकर हे कॅसिनोंमध्ये जाऊन कुणाचेही ओळखपत्र तपासू शकतील. जर कॅसिनो खेळण्यासाठी कुणी गोमंतकीय कॅसिनोमध्ये आलेले आढळले तर कॅसिनो व्यवसायिकाला मोठा दंड असायला हवा. सरकारने तशी तरतुद करावी असे काही विरोधी आमदारांना वाटते.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार