ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:41 IST2025-02-06T13:40:08+5:302025-02-06T13:41:42+5:30
ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे.

ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'विकसित भारत २०४७' साठी वैज्ञानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये आयोजित केलेल्या ऑसियन सोसायटी ऑफ इंडियाच्या ९ व्या राष्ट्रीय परिषदेत 'ऑसिकॉन २५'च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सिंग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.
ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे. जगभरातील समुद्र विज्ञान आणि संशोधनावर यामध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रीय समुद्र संस्था ही गोव्याची खास ओळख आहे. ऑसिकॉन २५ ही संशोधन कार्यशाळेत देशभरातील ८० संशोधन केंद्रातून ही सहभागी झाले आहेत. 'बदलते हवामानावर' चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. या चर्चासत्रात पर्यावरण, इतर विषयांवर संशोधनाचे सादरीकरण होईल. ६०० हून अधिक प्रतिनिधी
विज्ञानाला अधिक महत्त्व
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्य सरकार हे विज्ञानाला अधिक महत्त्व देत आहे. गोवा सरकार ब्लू इकॉनॉमी पुढे नेऊ पाहत आहे. त्यासाठी एनआयओचा पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकारने यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन केले आहे.
समुद्र संशोधनाची माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेअंतर्गत राज्यात समुद्र संशोधनाविषयी मोठी माहिती मिळते. या समुद्र विज्ञान संस्थेतर्फे राज्यात मासळी तसेच इतर विविध विषयांचे मार्गदर्शन मिळत असते. जरी ही संस्था केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकारकडून या संस्थेला योग्य ते सहकार्य मिळत आहे.