राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2024 12:44 IST2024-12-03T12:43:57+5:302024-12-03T12:44:27+5:30

व्हायब्रेट गोवाचे पदाधिकारी उपस्थित होते.

promote business culture in state said cm pramod sawant entrepreneurship lessons given to the youth | राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे

राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील व्यावसायिक संस्कृती वाढली पाहीजे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सरकारतर्फे आयटी आणि स्टार्टअपच्या सहाय्याने युवकांना व्यावसायात येण्यासाठी मदत करत आहोत. राज्यातील युवक केवळ सरकारी नोकरी आणि त्यातून मिळणाऱ्या २५ ते ३० हजार पगारावर आनंदी आहेत ही मानसिकता आम्हाला जीवनात मागे नेत आहे. ही मानसिकता बदलण्यासाठीच आम्ही वावरत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सोमवारी व्हायब्रेट गोवाच्या अमेझिंग गोवा जागतिक व्यावसायिक परिषदेतर्फे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी व्हायब्रेट गोवाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील युवकांनी दुसऱ्यांना काम द्यावे, एवढे सक्षम ते बनले पाहीजे. हे करण्यासाठी व्यावसाय हा एकमेव मार्ग आहे. युवकांनी शक्यतो व्यावसाय क्षेत्रात येऊन क्रांती करण्यावर भर द्यावा. हे करताना सर्वांपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज आहे. सरकारतर्फे आम्ही नेहमीच अशा युवकांना मदत करण्यास तत्पर असतो. इडीसीतर्फे तर व्यावसाय सुरु करण्यास केवळ दोन ते तीन टक्के व्याजावर कर्ज देत असतो. याचा उपयोग युवकांनी करुन घ्यावा. याचा फायदा युवकांना आपल्या आणि सोबत देशाच्या विकासासाठी देखील होणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयातून देश पुढे जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया, फिट इंडिया, यासारखे उपक्रम राबविले आहेत. ग्रीन एनर्जी यावर सध्या सरकार काम करत असून, हे करताना युवकांचा सहभाग खुप महत्वाचा ठरतो, असेही ते म्हणाले.

हटके विचार करा... 

राज्यातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रात युवकांना व्यावसाय करण्याची खुप संधी आहे. सरकारतर्फे दरवर्षी सुमारे ३५० कोटी रुपये कचरा व्यवस्थापन करण्यासाठी वापरला जातो, याचा अर्थ असा की सध्या जे कचरा व्यवस्थापन व्यावसायात आहेत ते कोट्याधीश आहेत. केवळ हटके विचार करण्याची गरज आहे.


 

Web Title: promote business culture in state said cm pramod sawant entrepreneurship lessons given to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.