म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याचे प्रकल्प अडचणीत

By Admin | Updated: October 3, 2015 03:37 IST2015-10-03T03:29:59+5:302015-10-03T03:37:07+5:30

पणजी : म्हादई नदीचे पाणी वळविले गेले, तर गोव्याचे सध्याचे आणि नियोजित पाणीपुरवठा प्रकल्पही अडचणीत येतील, अशी भीती तज्ज्ञांनी म्हादई पाणी

The project of turning Goa into Mhadei water crisis | म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याचे प्रकल्प अडचणीत

म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याचे प्रकल्प अडचणीत

पणजी : म्हादई नदीचे पाणी वळविले गेले, तर गोव्याचे सध्याचे आणि नियोजित पाणीपुरवठा प्रकल्पही अडचणीत येतील, अशी भीती तज्ज्ञांनी म्हादई पाणी तंटा लवादास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून व्यक्त केली आहे.
पाणीपुरवठा व जलसिंचनाचे प्रकल्प उभे करण्याचे गोवा सरकारचे प्रस्ताव आहेत. महाराष्ट्र किंवा कर्नाटकनेही म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला, तर हे प्रकल्प अडचणीत येतील, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गोवा सरकारतर्फे तज्ज्ञ साक्षीदार चेतन पंडित (वय ६३, रा. पुणे) यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पंडित हे व्यवसायाने हायड्रोलॉजिस्ट आहेत.
मांडवी नदीतील उपलब्ध पाणी, म्हादईच्या खोऱ्यातील पाणी आणि हायड्रोलॉजी पुरावा एवढ्या मर्यादित विषयापुरता आपण साक्षीदार या नात्याने पाणी तंटा लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत असल्याचे पंडित यांनी नमूद केले आहे. जलसंसाधन अभियांत्रिकी या विषयातील ते सल्लागार आहेत.
म्हादईच्या खोऱ्यातील विविध जागांना आपण व्यक्तिश: भेट दिलेली आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील घनदाट भागांना आपण भेट दिली आहे. म्हादई नदीचे खोरे हे १५८० चौरस किलोमीटर आहे. गोव्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के आहे. पश्चिम घाट क्षेत्रात कुठेच नद्यांची एकमेकांशी जोडणी केली जाऊ नये, असे डॉ. माधव गाडगीळ यांनी एका अहवालात म्हटल्याचे पंडित यांनी नमूद केले आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात कुठेच नवी धरणे व मोठे जलाशय यांना परवानगी दिली जाऊ नये, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.
म्हादई तथा मांडवी नदी ही २०३२ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरली आहे. गोव्यात १५८० चौ.कि. (७८ टक्के), कर्नाटकात ३७५ चौ.कि. (१८ टक्के), तर महाराष्ट्रात म्हादई नदी ७७ चौ.कि. (४ टक्के) आहे. म्हादई नदीच्या आणि या नदीशी निगडित उपनद्यांच्या पाण्यावर वन, वन्यजीव, राष्ट्रीय उद्याने, तर बोंडला, सलीम अली, भगवान महावीर, भीमगड अशी अभयारण्ये आहेत. नदीतील पाणी कमी झाले, तर अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांवर तसेच त्याभोवतीच्या वन क्षेत्रावर मोठा परिणाम होईल, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: The project of turning Goa into Mhadei water crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.