शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या नारळावरच बनतेय गोमंतकीयांची 'कढी'!; उत्पादनात ७ टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:42 IST

क्षेत्रफळही घटले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोमंतकीय खाद्यसंस्कृतीमध्ये नारळाला 'अविभाज्य' स्थान आहे. आमटी (हुमण) असो वा गोडधोड, नारळाशिवाय गोमंतकीय स्वयंपाकघर अपूर्णच मानले जाते. मात्र, सद्यःस्थितीत राज्याची वाढती गरज आणि घटते उत्पादन ही चिंतेची बाब ठरत आहे.

कृषी खात्याकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या दोन वर्षात नारळाचे उत्पादन जवळपास ७टक्क्यांहून अधिक घसरले आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र अशा राज्यांमधून आयात केल्या जाणाऱ्या नारळावर 'कढी' बनवावी लागत आहे.

कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात २०२४ मध्ये १६ कोटी ८ लाख ६० हजार नारळांचे उत्पादन घेतले गेले. हे उत्पादन वर्ष २०२५ मध्ये १५ कोटी ७ लाख ९ हजार नारळांवर आले आहे. याशिवाय राज्यातील नारळ लागवड क्षेत्रातही घट दिसून आली आहे. राज्यात २०२४ मध्ये ६,००३ हेक्टर क्षेत्रात नारळाचे उत्पादन घेतले जात होते. हे उत्पादन आता ५,६२५ हेक्टर एवढे झाले आहे. त्यामुळे राज्यात नारळाचे उत्पादन गेल्या काही वर्षांपासून घटतच चालले आहे.

नारळाची वाढती गरज लक्षात घेऊन, उत्पादन वाढविण्यासाठी कृषी खात्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. नारळ उत्पादनात घट होण्याच्या कारणांवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

त्यानुसार अनेक ठिकाणी नारळाच्या बागा जुन्या झाल्या आहेत. परिणामी, उत्पादकता घटली आहे. मजुरांची कमतरता आणि खत वापरण्याचा खर्च जास्त असल्यामुळे नारळ शेतीकडे अनेकदा दुर्लक्ष होते. शिवाय, माकडे, खार यांसारखे प्राणी फुलांचे भाग /लहान कोंब/कोवळ्या नारळाचे नुकसान करतात. त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो.

विविध उपाययोजना

यावर उपाय म्हणून कृषी खाते पीक संरक्षण उपकरणांच्या खरेदीवर ७५ टक्के अनुदान देत आहे. मिनी टिलर, वीड कटर आणि नारळ काढण्यासाठी झाडावर चढण्याचे यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देत यंत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. गरजेनुसार यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कृषी संचालनालयाच्या वतीने नारळ विकास बोर्डाच्या माध्यमातून योजना राबविल्या जात आहेत.

नवीन क्षेत्रात लागवडीसाठी 'एरिया अंडर कोकोनट' विस्तार योजनेत प्रतिहेक्टर ५६ हजार रुपये दोन समान वार्षिक हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. 'कोकोनट बेस्ड क्रॉपिंग सिस्टिम' अंतर्गत उत्पादन व उत्पादकता सुधारण्यासाठी ४२ हजार प्रतिहेक्टर दोन समान हप्त्यांमध्ये अनुदान दिले जाते. 'रिप्लांटिंग अँड रि-ज्युव्हिनेशन ऑफ कोकोनट गार्डन्स' योजनेत जुने माड तोडणे व काढण्यासाठी १ हजार रुपये प्रतिझाड, पुनःलागवडीसाठी ४५ रुपये प्रतिरोप आणि सध्याच्या नारळ झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी १७ हजार ५०० प्रतिहेक्टर दोन वार्षिक हप्त्यांमध्ये अनुदान दिले जात आहे.

दररोज लागतात ७ लाख नारळ

दरम्यान, राज्यात दिवसाला ६ ते ७ लाख नारळांची आवश्यकता आहे. एवढे उत्पादन नसल्याने केरळ, कर्नाटक, लगतच्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नारळांची आवक होते. यामुळे गेल्या काही वर्षात नारळाचा दर किमती ५० ते ७० रुपयांवर पोहोचल्या होत्या. सध्या बाजारात ६० रुपयांना एक या दराने नारळ मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Goans' Curry Relies on Imported Coconuts Amid 7% Production Drop

Web Summary : Goa's coconut production has declined by 7%, forcing reliance on imports from neighboring states. Decreasing coconut farmland and aging trees are major factors. The agriculture department is implementing schemes to boost local production, including subsidies for equipment and replanting.
टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र