राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कोविंद आज गोव्यात

By Admin | Updated: July 15, 2017 02:09 IST2017-07-15T02:04:09+5:302017-07-15T02:09:02+5:30

पणजी : राष्ट्रपतिपदाचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आज शनिवारी दुपारी तीन वाजता गोव्यात दाखल होत आहेत. भाजपसह मगोप,

Presidential candidate Kovind today in Goa | राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कोविंद आज गोव्यात

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कोविंद आज गोव्यात

पणजी : राष्ट्रपतिपदाचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आज शनिवारी दुपारी तीन वाजता गोव्यात दाखल होत आहेत. भाजपसह मगोप, गोवा फॉरवर्ड तसेच अपक्ष मंत्री व आमदार यांच्यासोबत कोविंद यांची आज बैठक होणार आहे. दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट बोगमाळो येथील एका हॉटेलमध्ये जातील. तिथे भाजपसह सत्ताधारी आघाडीमधील सगळे मंत्री, आमदार जातील. राष्ट्रपतिपदासाठी मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी पार पडणार आहे. कोविंद हे आपल्या प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रचाराच्या बैठकीची पूर्वकल्पना भाजप, गोवा फॉरवर्ड, मगोप व अपक्ष मंत्री, आमदारांना दिली आहे.

Web Title: Presidential candidate Kovind today in Goa