शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला अधिवेशनात धारेवर धरण्याची तयारी; रणनीतीसाठी विरोधी आमदारांची उद्या बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:06 IST

पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, लोक या सरकारला कंटाळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या १२ रोजीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत रणनीती ठरविण्यासाठी विरोधी आमदारांची बैठक उद्या, मंगळवारी (दि. ६) बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमात यांनी ही माहिती दिली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे गोव्याबाहेर होते. त्यामुळे बैठक पुढे ढकलावी लागली होती. ती उद्या, मंगळवारी होईल, असे युरी यांनी सांगितले.

याबाबत आलेमाव म्हणाले की, पर्यावरण हानी, बेरोजगारी, वाढते गुन्हे, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवरून या अधिवेशनात आम्ही सरकारला घेरणार आहोत. ज्या पद्धतीने दादागिरी व हुकूमशाही चालवली आहे, त्याचा जाब सरकारला विचारला जाईल. सरकारकडे कोणतेही धोरण नाही. आश्वासने दिली जातात, परंतु ती पाळली जात नाहीत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण असून, पुन्हा राज्याचे गुलाबी चित्र निर्माण केले जाते. सरकारच्या गैरकारभाराबद्दल विरोधक सामूहिकपणे जाब विचारतील.

युरी म्हणाले की, गोव्यात नाईट क्लबमधील दुर्घटनेत निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. अमली पदार्थ व्यवहार वाढलेले आहेत. रस्ता अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, लोक या सरकारला कंटाळले आहेत.

वीरेश बोरकर सहभागी होणार

दरम्यान, आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, उद्या, ६ रोजी सभापतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली असून, त्यानंतर युरी यांनी विरोधी आमदारांची बैठक बोलावली आहे. माझ्याशी त्यांनी संपर्क साधला असून, मी बैठकीला उपस्थित राहणार आहे. 

लोकांच्या प्रश्नांवर विरोधी आमदारांनी संयुक्तपणे आवाज उठवावा, ही आमचीही भूमिका आहे अधिवेशनाला आता जेमतेम सात ते आठ दिवस राहिले असून, विरोधकांनी काही प्रश्नांवर संयुक्तपणे लक्षवेधी सूचना सादर केल्यास सभापतींकडून त्या कामकाजात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन अल्पकालीन असल्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातूनही विरोधी आमदारांना आवाज उठवावा लागेल.

युती दिसणार का?

दरम्यान, अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ काँग्रेस व गोवा फॉरवर्ड एकत्र राहिले होते, तर आरजी व आपने वेगळी चूल मांडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभेत खरोखरच विरोधकांची युती दिसणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition to corner government in session; meeting for strategy tomorrow.

Web Summary : Opposition MLAs will meet tomorrow to strategize for the upcoming assembly session, planning to challenge the government on issues like environmental damage, unemployment, crime, and corruption. They accuse the government of lacking policy and failing to deliver on promises.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा