प्रतिमा कुतिन्होचा आपला रामराम: पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही
By सूरज.नाईकपवार | Updated: September 27, 2023 17:20 IST2023-09-27T17:16:33+5:302023-09-27T17:20:04+5:30
लोकसभा निवडणुक पुढच्या वर्षी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजिनामा चर्चेचा विषय ठरला आहे

प्रतिमा कुतिन्होचा आपला रामराम: पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही
मडगाव: प्रतिमा कुतिन्हो यांनी बुधवारी आपच्या गोवा राज्य उपाध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे. वैयक्तीक तसेच व्यवसायाचे कारण कुतिन्हो यांनी या राजिनाम्यामागे दिले आहे. लोकसभा निवडणुक पुढच्या वर्षी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजिनामा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रतिमा या आता कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबतही कुतुहुल निर्माण झाले आहे. कुतिन्हो यांच्याशी संपर्क साधला असता, सदया तरी आपला अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. आपण आपला व्यवसायावर यापुढे लक्ष केंद्रीत करणार असल्याच्याही त्या म्हणाल्या.
आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घाईघाईने घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपने आपल्यावर पक्षाच्या गोव्याच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्याबाबत आपण या पक्षाचे आभारी आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रतिमा कुतिन्हो या पुर्वी काँग्रेस पक्षात होत्या. फायर ब्रँड नेत्या अशी त्यांची ओळख होती. नावेली जिल्हा पंचायतीत त्यांंना पराभव पत्कारावा लागल्यानतंर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून आपमध्ये प्रवेश केला होता. नावेली विधानसभा निवडणुक त्यांनी आपच्या उमेदवारीवर लढविली होती. मात्र तेथेही त्या पराभूत झाल्या होत्या. गेले काही दिवस त्या आपपासून अलिप्त होत्या. आपल्या राजिनाम्याची प्रत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल तसेच गोवा राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांना पाठवून दिले आहे.