वीज दरवाढीचे संकट
By Admin | Updated: November 4, 2015 02:16 IST2015-11-04T02:15:47+5:302015-11-04T02:16:06+5:30
पणजी : वीज दर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून तब्बल ४000 कोटी रुपये उभे करण्याचे आणि त्यातून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, यासाठी खात्याने तयार

वीज दरवाढीचे संकट
पणजी : वीज दर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून तब्बल ४000 कोटी रुपये उभे करण्याचे आणि त्यातून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, यासाठी खात्याने तयार
केलेल्या व्यवसाय योजनेवर बुधवारी सुनावणीच्यावेळी वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोवा चेंबर आॅफ कॉमर्सने तसेच ग्राहक चळवळीतील संघटनांनी वीज दरवाढीस विरोध केला आहे.
संयुक्त वीज नियमन आयोगासमोर येथील राज्य संग्रहालय सभागृहात बुधवारी सकाळी १0 वाजता सुनावणी होणार आहे. बिझनेस प्लॅनव्दारे उभा केला जाणार असलेला हा निधी वीजविषयक पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात येत आहे.
ही सुनावणी जनतेसाठीही खुली आहे. ग्राहकांना काही ठिकाणी अजूनही बिले वेळेवर मिळत नाहीत तर काहींच्या बाबतीत अव्वाच्या सव्वा रक्कम घालून बिले माथी मारण्याचे प्रकार घडत आहेत. राजधानी पणजीसारख्या शहरातही अघोषित भार नियमन चालू आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी पावसाळ्याआधी तासन्तास शट डाउन घेतले जाते; परंतु पावसाळ्यात थोड्याश्या वाऱ्या-पावसातही वीज गुल होण्याचे प्रकार घडतात. अनेक ठिकाणी (पान २ वर)