शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:58 IST

धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते.

सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक

दिगंबर कामत, तवडकर, संकल्प किंवा काब्राल यांना मंत्रिपद मिळेल का याचे उत्तर मुख्यमंत्रीही सध्या देऊ शकत नाहीत. कारण सगळे काही दिल्लीत ठरत असते, हे मुख्यमंत्री सावंत यांनाही ठाऊक आहे. धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते.

गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच होईल, असे विधान जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले असते तर लोकांना आश्चर्य वाटले नसते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्याविषयी बोलले असते तर मुख्यमंत्र्यांचा तो अधिकारच आहे, असे लोकांनी म्हटले असते. मात्र चक्क विधानसभेचे सभापती मंत्रिमंडळ फेररचनेविषयी बोलले, हे लोकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. पूर्ण गोवा कालच्या शुक्रवारी होळी साजरी करण्याच्या आनंदात होता. सगळीकडे रंगांची उधळण सुरू होती. राजकीय नेते एकमेकांवर रंग उडवत होते. अशावेळी सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी खळबळ उडवून देणारी विधाने केली. 

मीडियाशी बोलताना त्यांनी सांगून टाकले की- पुढील पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय धसास लागेल. म्हणजे पंधरा दिवसांत फेररचना होईलच. आता तवडकर यांच्याकडे ही माहिती कुठून आली असे कुणी विचारू नये, कारण सर्वच आमदारांशी, मंत्र्यांशी गेले काही महिने भाजपचे केंद्रीय नेते बोलत आहेत. गोव्यात राजकीय स्थिती नेमकी काय आहे, कोणता मंत्री काम करतो, कोणता मंत्री काम करत नाही, कोणत्या मंत्र्याची इमेज लोकांमध्ये कशी आहे, ही माहिती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोळा केली आहे. मात्र पुढील पंधरा दिवसांत विषय धसास लागेल म्हणजे फेरबदल वगैरे होतील, असे सभापतींनी जाहीर करणे हे भाजपसाठीही धक्कादायक ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातली गोष्ट तवडकर कशी जाहीर करू शकतात, असा प्रश्न लोकांना पडणे स्वाभाविक आहे. भाजप कोअर कमिटीच्या काही सदस्यांनी लोकमतशी खासगीत बोलताना आश्चर्य व्यक्त केले.

तवडकर यांनी स्वतः जाहीरपणे कधी मंत्रिपदावर दावा केलेला नाही. एकदा तर त्यांनी मंत्री गोविंद गावडे यांनाही सांगितले की- आपल्याला मंत्रिपद नको आहे, त्यामुळे तुम्ही असुरक्षित होण्याचे कारण नाही. मात्र लोकांना हे ठाऊक आहे की-तवडकर यांना यापुढील काळात मंत्रिपद मिळेल. तवडकर यांना सभापती करतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितले होते की फक्त अडीच वर्षांसाठी सभापती व्हा. आता तर तीन वर्षे होऊन गेली, पण अजून तवडकर यांना सभापतिपदावरच ठेवले गेले आहे. विविध मंत्री सध्या राजाच्या थाटात जगत असताना तवडकर यांनी किती काळ फक्त सभापतिपदीच राहावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात येतोच. 

काणकोणमधील कार्यकर्ते आपल्या आमदाराकडे मंत्रिपद आलेले पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. गेली अनेक वर्षे काणकोणकडे मंत्रिपद आलेले नाही. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनाही मंत्रिपदाची खुर्ची लवकर हवी आहे. कामत यांचे कार्यकर्ते गेली दोन वर्षे प्रतीक्षा करत आहेत. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनाही मंत्रिपदाचा मुकुट लवकर डोक्यावर हवा आहे. त्यांचे शेजारचे आमदार दाजी साळकर यांच्यापेक्षा आपण पॉवरफुल्ल आहोत, हे संकल्प यांना दाखवायचे आहे. एकदा संकल्प मंत्री झाले की मग मुरगाव तालुक्यात माविन गुदिन्हो यांच्याएवढेच संकल्पचे महत्त्व वाढेल. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही संकल्पच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे केली असल्याची माहिती मिळते. परवा तवडकर यांनी कामत, संकल्प, नीलेश काब्राल, लोबो यांचीही नावे घेतली. तवडकर चांगल्या मूडमध्ये होते. होळीदिवशी त्यांचा उत्साह वाढला. त्यांनी लोबो, कामत, काब्राल, संकल्प यांच्याही नावांचा उल्लेख केला आणि काय तो सोक्षमोक्ष पंधरा दिवसांत लागेल असे सांगून टाकले. तवडकर यांची ही भविष्यवाणी अनुभवातून आलेली आहे. ती किती खरी ठरते, एप्रिल महिन्यात कळून येईलच.

गोव्यातील काही मंत्र्यांनाही ठाऊक आहे की मंत्रिमंडळ फेररचना होईलच. मध्यंतरी मुख्यमंत्रीदेखील बदलेल अशी चर्चा सुरू झाली होती. विश्वजित राणे, तवडकर, राजेंद्र आर्लेकर यांचीही नावे त्यासाठी काहीजणांनी चर्चेत आणली होती. मात्र नेतृत्व बदल होणार नाही हेही तेवढेच खरे आहे. गोविंद गावडे यांच्याशी भाजपच्या कोअर टीमचे तितकेसे पटत नाही. काही पदाधिकारी तवडकर यांच्या प्रेमात नाहीत, पण ते गावडे यांच्यावर नाराज आहेत. अशा काहींनी तवडकरना मंत्री करा व गावडे किंवा गणेश गावकर यांना सभापती करा असे सुचविलेले आहे. सभापतिपदाची खुर्ची स्वीकारण्यास कुणीच तयार नाही. मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात आले होते. त्यांनी काही नेत्यांशी चर्चा केली आहे. गोविंद गावडे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचे काम कसे चाललेय हे संतोष यांनी जाणून घेतले. 

महसूल खात्याविषयी खूप तक्रारी आहेत, हे संतोषींच्या लक्षात आले. त्याच दिवसांत पांडुरंग मडकईकर यांनी शाब्दिक बाँब टाकला होता. गोवा सरकारला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःची इमेज बदलावी लागेल. राज्यात वादाचे विषय अनेक आहेत. पर्वरीतील खाप्रेश्वर देवाचा विषय आहेच. टीसीपीच्या विषयावर सामाजिक कार्यकर्ते नाराज आहेत. यावर उपाय काढावा लागेल. दिगंबर कामत, तवडकर, संकल्प किंवा काब्राल यांना मंत्रिपद मिळेल का याचे उत्तर मुख्यमंत्रीही सध्या देऊ शकत नाहीत. कारण सगळे काही दिल्लीत ठरत असते हे मुख्यमंत्री सावंत यांनाही ठाऊक आहे. धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच.

नवे चेहरे हवे आहेत...

मुख्यमंत्री सावंत यांनाही मंत्रिमंडळात काही नवे चेहरे हवे आहेत. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही यापूर्वीच काही नावे संभाव्य मंत्री म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडे दिली आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही काही नावांची शिफारस केली आहे. आता खरोखर पुढील पंधरा दिवसांत मंत्रिमंडळाची राजकीय धुळवड होतेय का हे पाहावे लागेल.

तवडकर यांनी स्वतः जाहीरपणे कधी मंत्रिपदावर दावा केलेला नाही. एकदा तर त्यांनी मंत्री गोविंद गावडे यांनाही सांगितले की- आपल्याला मंत्रिपद नको आहे, त्यामुळे तुम्ही असुरक्षित होण्याचे कारण नाही. मात्र लोकांना हे ठाऊक आहे की- तवडकर यांना यापुढील काळात मंत्रिपद मिळेल. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते.

२०२७ ची विधानसभा निवडणूक जर जिंकायची असेल तर आता बदल करावेच लागतील. शस्त्रक्रिया करावीच लागेल. ज्या मंत्र्यांचे वय खूप झालेले आहे, त्यांना बाजूला करावे लागेल याची कल्पना स्थानिक नेतृत्वाला आलेली आहे असे दिसते.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार