शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंड केले नाही म्हणून राजकीय समीकरणेही अबाधित - लक्ष्मीकांत पार्सेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 22:40 IST

पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील महत्त्वाचे नेते आहेत.

पणजी : मी भाजपाचे काम करत राहीन, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. आपण बंड केले नाही व पोटनिवडणूक लढवली नाही म्हणून राज्यातील राजकीय समीकरणेही अबाधित राहिली असाही पार्सेकर यांचा दावा आहे.

पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील महत्त्वाचे नेते आहेत. ते दोनवेळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र मध्यंतरी त्यांनी भाजपाच्या एका अधिकृत उमेदवाराविरुद्ध आपण निवडणूक रिंगणात उतरीन असे जाहीर केल्याने त्यांच्यावर दयानंद सोपटे या निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवाराने टीका केली. पार्सेकर यांच्या समर्थकांनी आपल्याविरुद्ध काम केले पण तरीही आपण जिंकलो असे सोपटे यांनी नमूद केले. तसेच पार्सेकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा सोपटे यांनी दावा करून पार्सेकरांची कृती ही त्यांना पक्षातून बाहेर काढण्याच्या स्तरावरील आहे, अशीही टिप्पणी केली.

या पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी लोकमतला फोनवरून मुलाखत दिली. दिल्ली भेटीत पार्सेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल आदींची भेट घेतल्याची माहिती मिळते. तथापि, पार्सेकर म्हणाले, की मी पोटनिवडणुकीच्या काळात कोणत्याच भाजपाविरोधी कारवाया केल्या नाहीत. मी पक्षाचे अधिकृत उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची प्रारंभी तयारी केली होती पण ज्या दिवशी मी भाजपामधून बाहेर जाणार नाही व निवडणुकही लढवणार नाही असे ठरवले, त्या दिवसापासून मी भाजपाचेच काम करत आहे.

मी निवडणूक काळात माझ्या शैक्षणिक संस्थांच्या कामात व्यस्त राहिलो. मी सोपटे यांना मत देऊ नका, असे एकाही भाजपा कार्यकर्त्याला किंवा इतरांनाही सांगितले नाही. मी भाजपाचे काम निष्ठेने करत राहीन. जर मी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलो असतो तर निश्चितच जिंकूनही आलो असतो व भाजपचा एक माजी मुख्यमंत्रीच बंड करून निवडणूक लढवत असल्याचा संदेश सगळीकडे गेला असता. या संदेशाचा परिणाम म्हणून शिरोडा व म्हापसा मतदारसंघातीलही राजकीय समीकरणे प्रभावित झाली असती. मी तसे काही केले नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा