शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशातील खुनाचा पोलिसांनी 48 तासात लावला छडा 

By काशिराम म्हांबरे | Updated: April 17, 2023 17:55 IST

म्हापशातील खुनाचा पोलिसांनी 48 तासात लावला छडा लावला. 

म्हापसा (गोवा) : येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूला खुल्या शेतजमिनीत शनिवारी झालेल्या खून प्रकरणाचा छडा म्हापसा  पोलिसांनी 48 तासात लावला आहे. एका खाजगी सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नबीन बी के (32 वय ) खून प्रकरणी संशयित किरण शिंदे  ( वय  19 याला  अटक केली आहे.  गळ्यावर काचेची बाटली खूपसल्याने त्याचा खून झाला होता. 

घटना ही १५ रोजी दुपारी ३च्या सुमारास उघडकीस आली. गळ्यावर काचेची बाटली खूपसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने नबीनचा मृत पावला होता. नबीनच्या गळ्यात काचेचा तुकडा अडकल्याने मोठी जखम झाली होती. त्याशिवाय पोलिसांना मृतदेहाच्या बाजूला एक काचेची दारुची बाटली फोडलेली व बाटलीच्या काचा विखुरलेल्या सापडल्या. तसेच एक बॅकपॅक मयताजवळ सापडली होती. ज्यामध्ये कपडे, मेडिकल रिपोर्टची फाईल व त्याचे ओळखपत्रही सापडले होत. घटनेनंतर पोलिसांनी कलम 302 खाली गुन्हा दाखल केला होता.

तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकाचा वापर केला होता. तसेच परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले होते. फुटेजच्या आधारावर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. घटनेच्या दिवशी पहाटे तुमच्या दरम्यान मयत एका संशयित व्यक्तीबरोबर फिरत असताना ते आढळून आले होते. संशयिताला अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. शेवटी 48 तासाच्या तपासानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान संशयिताने  आपल्या गुन्ह्याचे कबुली दिली आहे. खुनाच्या वेळी संशयिताने  वापरलेले तसेच रक्ताचे डाग असलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत हा खुनाचा  प्रकार घडल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पुढील तपास निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस