पोलीस हतबल : पणजीला धास्ती आजच्या कोंडीची
By Admin | Updated: December 31, 2015 02:22 IST2015-12-31T02:22:05+5:302015-12-31T02:22:48+5:30
पणजी/पर्वरी : नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात पर्यटकांचे तांडेच्या तांडे उतरल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार

पोलीस हतबल : पणजीला धास्ती आजच्या कोंडीची
पणजी/पर्वरी : नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात पर्यटकांचे तांडेच्या तांडे उतरल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार बुधवारीही घडले. ही कोंडी हाताळण्यात पोलीस पूर्णपणे हतबल ठरल्याचे चित्र दिसून आले. राजधानी पणजीसह पर्वरी, बांबोळीपर्यंत तसेच मिरामार, दोनापावलपर्यंत वाहनांची गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली. पर्वरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून महामार्गावर ‘मेगाब्लॉक’ झाला. कळंगुट, कांदोळी, हणजूण आदी किनारी भागातही कोंडी झाल्याने वाहने अडकून पडली. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक उतरले आहेत. गुरुवारी ‘थर्टी फर्स्ट’ असल्याने वाहतुकीचे तीन-तेरा वाजण्याची शक्यता आहे.
वाहतूक व्यवस्था पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे बुधवारच्या मेगाब्लॉकवरून स्पष्ट झाले. वाहतूक विभागाची या कोंडीमुळे पार फजिती झाली आहे. मांडवीवरील तिसऱ्या (पान २ वर)