पणजीत शहरात कार्निव्हल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, मनपा मात्र ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:19 PM2020-02-19T22:19:58+5:302020-02-19T22:20:10+5:30

पणजी कार्निव्हल समितीचे अध्यक्ष या नात्याने बोलताना महापौर उदय मडकइंकर यांनी ही माहिती दिली.

Police denied permission for carnival procession in Panjit city | पणजीत शहरात कार्निव्हल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, मनपा मात्र ठाम

पणजीत शहरात कार्निव्हल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, मनपा मात्र ठाम

Next

पणजी - पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी कार्निव्हल मिरवणूक शहरातच काढली जाईल, अशी ठाम भूमिका पणजी महापालिकेने घेतली आहे. या प्रश्नावर जिल्हाधिका-यांनी उद्या गुरुवारी वरिष्ठ पोलिस अधिका-यांबरोबर बैठक बोलावली आहे. यंदा प्रथमच कार्निव्हल मिरवणुकीसाठी महापालिकेने ५00 तिकिटे विक्रीस ठेवली आहेत. तसेच सांबा स्क्वेअरमध्ये चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पत्रकार परिषदेत पणजी कार्निव्हल समितीचे अध्यक्ष या नात्याने बोलताना महापौर उदय मडकइंकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘शहरात कार्निव्हल मिरवणुकीचे येत्या शनिवारी २२ रोजी आयोजन आहे. त्यासाठी तयारी सुरु झालेली आहे. मिरवणुकीचा मार्ग बदलणे आता शक्य नाही. या विषयावर स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यासह आम्ही जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे त्यांच्याकडूनच समजले. या प्रश्नावर आज गुरुवारी जिल्हाधिकाºयांनी वाहतूक पोलिस अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. बंदर कप्तान जेटीसमोर तसेच मांडवी हॉटेलसमोर मंडप घालून आसन व्यवस्था केली जाईल. हॉटेल व्यावसायिकांकडून नेहमी पासेसची मागणी होते. तिकिटे विकत घेऊन पर्यटकांना आनंद लुटता येईल. महापालिकेचे शंभर स्वयंसेवक मिरवणुकीच्यावेळी व्यवस्था सांभाळतील.’

मडकईकर एका प्रश्नावर म्हणाले की, ‘गेल्या वर्षी मांडवी पुलाचे काम चालू होते त्यामुळे चित्ररथांना अडचणीचे ठरले होते त्यामुळेच मिरामार सर्कल ते दोनापॉल असा मिरवणुकीचा मार्ग होता. यावेळी जुन्या सचिवालयासमोर बावटा दाखवून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि कला अकादमीपर्यंत मिरवणूक चालेल. त्यानंतर त्याच मार्गाने चित्ररथ पुढे जातील. शहरात येण्यास किंवा माघारी फिरण्यास चित्ररथांना मनाई आहे.’

सांबा स्क्वेअरमध्ये भरगच्च कार्यक्रम 

आयुक्त संजित रॉड्रिग्स म्हणाले की, ‘सांबा स्केवअरमध्ये ‘प्ले फॉर कॉज’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होणार आहे. समाज कल्याण हा हेतू आहे. नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतील तसेच नामांकित बँड पथके कार्यक्रम सादर करतील. फूड स्टॉल्सवर अन्न पदार्थांचा आस्वाद घेता येईल. 

महापालिकेचा यंदा स्वत:चा चित्ररथ मिरवणुकीत असेल. ‘गोवा वेडिंग डेस्टिनेशन’ अर्थात विवाह समारंभांसाठी गोवा आदर्श ठिकाण या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ प्रसिध्द कलाकार मार्टिन्स यांनी बनविला आहे. पत्रकार परिषदेस उपमहापौर पाश्कोला माश्कारेन्हस, नगरसेविका सोराया पिंटो माखिजा, मिनीन डिक्रुझ आदी उपस्थित होते. दरम्यान, आजपावेतो चित्ररथ मिरवणुकीसाठी २७ अर्ज आल्याची माहिती महापौरांनी दिली. व्यावसायिक चित्ररथांवर काही निर्बंध आहेत. एकही व्यावसायिक चत्ररथाचा अर्ज अजून आलेला नाही. 

 

 

 

 

Web Title: Police denied permission for carnival procession in Panjit city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा