रायबंदर अपघातात पोलीस शिपाई ठार

By Admin | Updated: July 7, 2015 01:56 IST2015-07-07T01:56:49+5:302015-07-07T01:56:56+5:30

तिसवाडी : रायबंदर-पणजी मर्गावर प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मडकई येथील दुचाकीचालक ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ८.३५

Police commander killed in Rai Bunder accident | रायबंदर अपघातात पोलीस शिपाई ठार

रायबंदर अपघातात पोलीस शिपाई ठार

तिसवाडी : रायबंदर-पणजी मर्गावर प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मडकई येथील दुचाकीचालक ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ८.३५ वाजता घडला. मृताचे नाव निर्जय महादेव गावडे (वय २२) असे असून तो गोवा पोलीस दलात ‘आयआरबी’ विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता.
जुने-गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्जय आपल्या मोटारसायकलवरून (क्र. जीए ०७ एच ४४६१) पणजीकडे जात असता तो स्वत: तोल जाऊन पडला व त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो गतप्राण झाला. हा अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक एका प्रवासी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता; पण बस रस्त्यावर किंचित उजव्या बाजूला आल्याने मोटारसायकलला सौम्य धक्का बसला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला त्याने जोरदार धडक दिली. डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याचे डोके रस्त्यावर आदळून तो गतप्राण झाला.
ज्या बसला धक्का बसला, ती न थांबता सुसाट पणजीच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची खबर देऊनही १०८ वाहन घटनास्थळी पोहोचण्यासाठी अर्धा तास लागला, तर पोलिस एका तासानंतर पोहोचले. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर वाळपई
येथील एका तरुण कॉन्स्टेबलचा असाच दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता.
सध्या जुने गोवे ते पणजी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने ९० टक्के वाहने जुने गोवे-रायबंदरच्या जुन्या व अरुंद मार्गावरून जात असल्याने या मार्गावर प्रचंड प्रमाणात रहदारी असते. वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलीस
कमी पडत असल्याने आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे
या मार्गावरील वाहतूक दोन तास
खोळंबून राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. (प्रतिनिधी)

Web Title: Police commander killed in Rai Bunder accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.