शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:58 IST

गजाआड करण्यात आलेल्या आठ संशयितापैंकी सहा जण अल्पवयीन

वास्को: दक्षीण गोव्यातील वेर्णा पोलीसांनी दुचाकी चोरांच्या ८ जणांच्या एका टोळीला गजाआड केले असून या टोळीत सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या टोळीला गजाआड करून त्यांच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून अन्य एक दुचाकी जप्त करण्याच्या मार्गावर पोलीस असल्याची माहिती निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली.काही दिवसापूर्वी कुठ्ठाळी येथील चर्चमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात वेर्णा पोलीसांनी पोबारा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच संशयित चोरट्यांपैकी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चर्चमधील चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दुचाकी चोरांच्या एका टोळीतसुद्धा सहभाग असल्याची माहिती उपलब्ध झाली. यानंतर वेर्णा पोलीसांनी सदर दुचाकी चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचल्यानंतर सोमवारी (दि.२९) पहाटे त्यांनी आठ जणांच्या चोरांच्या एका टोळीला गजाआड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. सदर टोळीतील संशयित गोव्यातील विविध भागात लपून बसलेले असल्याची माहिती चोडणकर यांनी देऊन त्यांना त्या त्या ठिकाण्यावरून गजाआड करण्यात आले असल्याचे सांगितले.

पकडण्यात आलेल्या टोळीकडून अजून वेर्णा पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या असून यात दोन पल्सर, १ एवियेटर व १ केटीएम दुचाकीचा समावेश असल्याचे सांगितले. या टोळीने अन्य एक पल्सर दुचाकी चोरी केलेली असल्याचे अजूनपर्यंत स्पष्ट झाले असून लवकरच ती जप्त करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली. सदर दुचाकी बेळगाव, फोडा, म्हापसा व वेर्णा भागातून चोरी करण्यात आल्या होत्या अशी माहीती पोलीसांनी दिली.

वेर्णा पोलीसांनी दुचाकी चोरांच्या गजाआड केलेल्या आठ जणांच्या या टोळीतील सहा जण अल्पवयीन असल्याने त्यांना मेरशी येथील अपना घरात पाठवलेले असल्याचे निरीक्षक चोडणकर यांनी सांगितले. सदर टोळीतील अन्य दोन संशयित चोरट्यांची नावे सुरज राजू कोकाटे (रा. बेतूल, वेळ्ळी. वय १९) व क्लाईव मानुयेल कास्ताना (रा. विराभाट, कुडतरी. वय १९) असे असल्याची माहिती देऊन त्यांना या चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले असल्याचे सांगितले. या टोळीत अन्य चोरट्यांचासुद्धा समावेश असण्याची शक्यता असून त्यांनी अन्य वाहने सुद्धा चोरी केली असावीत असा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असून याबाबत सर्व मार्गाने तपास चालू आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या या चार दुचाकींची किंमत ४ लाख ७ हजार रुपया असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. काही दिवसापूर्वी कुठ्ठाळी येथील चर्च तसेच साकवाळ येथील गणपती मंदिरात (एकाच दिवशी) झालेल्या चोरी प्रकरणात वेर्णा पोलीसांनी पकडलेल्या या टोळीतील काही संशयित चोरट्यांचा हात असू शकतो असा संशय व्यक्त केला असून त्याही मार्गाने पोलीस तपास करत आहेत.दुचाकी चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिकाऱ्यांसह ३० पोलीस शिपायांनी घेतले परिश्रमकुठ्ठाळी येथील चर्चमध्ये चोरी करून पलायन करत असताना पाच जणाच्या टोळीतील एका अल्पवयीन संशयिताला वेर्णा पोलिसांना पकडल्यानंतर त्याचा दुचाकी चोरांच्या टोळीत हात असल्याची माहिती उपलब्ध झाली. या चोरांच्या टोळीने विविध ठिकाणी दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पुढे उपलब्ध झाली असून ते गोव्यातील विविध भागात लपून असल्याचे समजले. सदर टोळीला गजाआड करण्यासाठी वेर्णा पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा पोलीस तपासणी विभागाचा पूर्ण पाठींबा मिळाला असून या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी अधिकाऱ्यांसह एकूण ३० पोलीस जवानांची (एलआयबी) मदत मिळाली असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिसgoaगोवा