शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

आरोप मागे घेण्यास पोलिसांची हरकत

By admin | Updated: August 13, 2016 02:03 IST

मडगाव : वेळ्ळी येथील पोलिसांवरील खुनी हल्लाप्रकरणातील आरोपींवरील आरोप मागे घेण्यासाठी या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांनी

मडगाव : वेळ्ळी येथील पोलिसांवरील खुनी हल्लाप्रकरणातील आरोपींवरील आरोप मागे घेण्यासाठी या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. आता या खटल्याची सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. मडगावचे प्रथमवर्ग न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात शुक्रवारी हा खटला सुनावणीस आला असता, हवालदार कृष्णानंद राणे व पोलीस शिपाई कुलदीप देसाई यांनी आपली बाजू न्यायालयात अर्जाद्वारे मांडली. या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. हवालदार कृष्णानंद राणे यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात आरोपीवरील आरोप मागे घेण्यास आक्षेप घेताना सर्व आरोपींना शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. तर कुलदीप देसाई यांनी याप्रकरणी जोपर्यंत आरोपपत्र सादर केले जात नाही, तोपर्यंत बाजू मांडणे अशक्य असल्याच्या आशयाचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. आरोपीवर कुठले आरोप आहेत, हे आरोपी कोण आहेत व सरकार पक्षाने आरोपींवर खटला चालविण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याच्या आशयाचा अर्ज सादर केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन पोलिसांनीही सुनावणीस हजर राहावे यासाठी त्यांना पुन्हा नव्याने समन्स पाठविण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. २0१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी वेळ्ळी चर्चच्या आवारात आलेल्या पोलिसांवर लोकांनी प्राणघातक हल्ला केला होता. फा. रोमानियो गोन्साल्वीस यांच्यासह एक पाद्री व काहीजणांवर पोलिसांवर खुनी हल्ला केल्याचे आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, नंतर संशयितांनी सरकारवर परत खटला दाखल न करण्याची हमी दिल्यास हे आरोपपत्र मागे घेण्याची तयारी शासनाने दाखवली होती. हे आरोपपत्र मागे घ्यावे यासाठी स्थानिक आमदार बेंजामीन सिल्वा यांनी विशेष प्रयत्न केले होते. या प्रकरणात २0 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले होते. भादंसंच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १८६, ३0७, ३२३, ३२४, ३२६, ३३२, ३३३, ३४१, ३४२ व ३५३ कलमांखाली कुंकळ्ळी पोलिसांनी संशयितांविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. या हल्ल्यात सीआयडी विभागाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कपिल नायक, हवालदार कृष्णानंद राणे व पोलीस शिपाई कुलदीप देसाई हे जखमी झाले होते. समाजामध्ये शांतता व सलोखा राखण्यासाठी हा खटला मागे घ्यावा, असे अभियोग संचालनालयाने कळविले असून, न्यायालयाने हा खटला मागे घ्यावा, अशी विनंती साहाय्यक सरकारी वकिलांनी न्यायालयात यापूर्वीच्या सुनावणीवेळी केली होती. (प्रतिनिधी)