वेर्ण्यात २२ जणांना विषबाधा
By Admin | Updated: October 30, 2015 02:20 IST2015-10-30T02:19:27+5:302015-10-30T02:20:44+5:30
मडगाव : सोदोवी-वेर्णा येथे एका धार्मिक कार्यक्रमात चिकन रोल व पॅटिस खाल्ल्याने २२ जणांना विषबाधा झाली. गुरुवारी सकाळी या लोकांना उलट्या होऊ लागल्याने

वेर्ण्यात २२ जणांना विषबाधा
मडगाव : सोदोवी-वेर्णा येथे एका धार्मिक कार्यक्रमात चिकन रोल व पॅटिस खाल्ल्याने २२ जणांना विषबाधा झाली. गुरुवारी सकाळी या लोकांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिसिओत दाखल करण्यात आले. त्यातील सात जणांना उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, सोदोवी-वेर्णा येथील जुडिद रिबेलो यांच्या घरी बुधवार, दि. २८ रोजी सायंकाळी सायबीण आणली होती. आगशी येथील एका बेकरीतून या कार्यक्रमासाठी चिकन रोल व पॅटिस आणले होते. ते खाल्ल्यानंतर गुरुवारी सकाळी २२ जणांच्या पोटात मळमळू लागले. त्यांना लागलीच उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसिओत दाखल करण्यात आले.
नॅश्विल दालयेत (११), संजिला दालयेत (१५), चार्ल्स दालयेत (४१), फरिदा फर्नांडिस (२४), सेबेस्तियान सिल्वेस्टर (७0), पवन कुमार (२६), फ्रान्सिस्का सिल्वेस्टर (३७), रॉक सांतान (६७), आंतोनियत
लोबो (६८), हिरामणी मेराल्ड (३३), नीलम मिरज (११), आलेक्स रिबेलो (५८), डेल्फिना रिबेलो (६0), लक्ष्मी देवी (२७), सुखदेव महांतो (३0) अशी हॉस्पिसिओत उपचारासाठी दाखल केलेल्यांची नावे आहेत.
रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती हॉस्पिसिओच्या वैद्यकीय अधीक्षक आयरा आल्मेदा यांनी दिली. (प्रतिनिधी)