शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींची 12 एप्रिलला गोव्यात सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 18:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 12 एप्रिल रोजी उत्तर गोव्यात सभा होणार आहे. प्रदेश भाजपाने त्याविषयीची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 12 एप्रिल रोजी उत्तर गोव्यात सभा होणार आहे. प्रदेश भाजपाने त्याविषयीची तयारी सुरू केली आहे.मोदी यांची सभा गेल्या महिन्यात गोव्यात व्हावी असा प्रयत्न झाला होता पण सभा होऊ शकली नाही. पंतप्रधानांची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाईल.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 12 एप्रिल रोजी उत्तर गोव्यात सभा होणार आहे. प्रदेश भाजपाने त्याविषयीची तयारी सुरू केली आहे.

मोदी यांची सभा गेल्या महिन्यात गोव्यात व्हावी असा प्रयत्न झाला होता पण सभा होऊ शकली नाही. गोव्यात तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येतील असेही सरकारने अगोदर जाहीर केले होते पण पुलाच्या उद्घाटनाला मोदी पोहचले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले गेले. मध्यंतरी खनिज खाण अवलंबितांनी पंतप्रधानांना खाण बंदीविषयी प्रश्न विचारण्याचे ठरविले होते. मात्र पंतप्रधान गोव्यात न पोहचल्यामुळे प्रश्न विचारता आला नाही. नंतरच्या काळात दिल्लीत खाण अवलंबितांना पंतप्रधानांची भेट मिळाली पण त्या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही.

पंतप्रधानांची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाईल. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मेरशी येथील शेतात असलेल्या भव्य जागेत मोदी यांची सभा झाली होती. गोव्यात 23 एप्रिलला निवडणुकीचे मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन घेतलेले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गोवा भेटीवर येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. 

दरम्यान, मैं भी चौकीदार मोहीमेला ज्या लोकांनी पाठींबा दिला आहे, अशा लोकांशी पंतप्रधान मोदी 31 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. देशात एकूण पाचशे ठिकाणी अशा प्रकारे संवादाचा कार्यक्रम होईल. गोव्यात पेडे म्हापसा येथील वृंदावर हॉस्पिटलजवळील रस्टीक रोज हॉलमध्ये आणि दक्षिण गोव्यात काकोडा- कुडचडे येथील काडा सभागृहात कार्यक्रम होईल. तिथे पक्षाचे नेते व कार्यकर्ते जमतील. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक