पेट्रोल दरवाढीवर लवकरच तोडगा निघेल - मुख्तार अब्बास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 16:41 IST2018-06-03T15:55:07+5:302018-06-03T16:41:35+5:30
पेट्रोलच्या वाढत्या दरांबद्दल सरकारा चिंता आहे आणि सरकार त्यावर गांभिर्याने उपाय योजना करीत आहे

पेट्रोल दरवाढीवर लवकरच तोडगा निघेल - मुख्तार अब्बास
पणजी - पेट्रोलच्या वाढत्या दरांबद्दल सरकारा चिंता आहे आणि सरकार त्यावर गांभिर्याने उपाय योजना करीत आहे व त्यातून तोडगा निघेल असे भाजप नेते व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बा नकवी यांनी म्हटले आहे. केंद्रातील भाजप सरकारने 4 वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने सरकारच्या कामांची माहिती जनतेला देण्याच्या मोहीमेचा भाग म्हणून ते पणजीत आले होते.
पत्रकार परिषदेत बोलतना ते म्हणाले की इंधनच्या वाढत्या किंमती या लोकांसाठी जाचक ठऱत आहेत. सरकारलाही त्याची जाणीव आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व प्रधानमंत्री याच्यावर निश्चितच तोडगा काढतील. त्या दृष्टीने गांभिर्याने काम सुरू आहे. अलिकडच्या लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल विचारले असता त्यांनी ही फार मोठी चिंतेची गोष्ट नसल्याचे सांगितले. उलट भाजप विरोधी शक्ती एकत्र आल्यास त्यांची धाव कुठपऱ्यंत जाऊ शकते याची कल्पना अगोदरच आल्यामुळे त्या दृष्टीने रणनीती ठरविणे पक्षाला श्यक्य होणार आहे असे ते म्हणाले.
भाजप राजवटीत देशात अल्पसंख्याकावर हल्ले व अत्त्याचार होत आहेत हा भाजप विरोधकांचा कांगावा खोटा आहे. उलट भाजप सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगलींना आळा बसला आहे. ज्या काही ठराविक घटना घडल्या त्यावरही त्वरित कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सरकार हे सर्व सामावेशक सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे त्यांनी सांगितले.