कामत, चर्चिल, वाचासुंदर यांच्या नार्को टेस्टसाठी मागितली परवानगी
By Admin | Updated: September 30, 2015 01:21 IST2015-09-30T01:21:20+5:302015-09-30T01:21:36+5:30
पणजी : लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणातील आरोपी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर

कामत, चर्चिल, वाचासुंदर यांच्या नार्को टेस्टसाठी मागितली परवानगी
पणजी : लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणातील आरोपी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांची नार्को चाचणी घेण्यासाठी क्राईम ब्रँचकडून न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. तुरुंगात असलेले चर्चिल आणि वाचासुंदर, तसेच अटकपूर्व जामीन राखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत असलेले कामत यांची नार्को चाचणी करण्यासाठी क्राईम ब्रँचकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पणजी सत्र न्यायालयात अर्जही करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी मिळाल्यास नार्को चाचणी करण्यासाठी तयारीही क्राईम ब्रँचने ठेवली आहे. विशेष सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.
(पान २ वर)