शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 7:26 PM

गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रतिक्रिया  

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली, अशी शब्दात तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पानीपतावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

चोडणकर म्हणतात की, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या खोटाडरडेपणाला जनतेने चोख उत्तर दिले. हे मतदान स्वातंत्र्य, लोकशाही आणि निधर्मी तत्त्वांसाठी आणि बहुसांस्कृतिक भारतासाठी झालेले आहे. समावेशक भारताची ओळख जनतेला कायम ठेवायची असून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भारतीय राजकीय व्यवस्थेसाठी नवी दिशा लोकांनी घालून दिली आहे.’

मोदी यांच्या लोकशाही संस्था नष्ट करण्याच्या तसेच फुटीच्या राजकारणाच्या नीतीला कंटाळून लोकांनी हा कौल दिला आहे. काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखलेले धोरण तसेच भ्रष्टाचाराविरुध्द उघडलेल्या आघाडीलाही जाते.

 ‘गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम’  या निकालांचा गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या गोवा फॉरवर्ड तसेच अन्य घटक पक्षाला हा धडा आहे. या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विधानसभेत तसेच सभागृहाबाहेरही टीका केली होती, असे चोडणकर म्हणतात. मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला किंमत मोजावी लागेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला दिलेला कौल भाजने हिरावून घेतला. गेले नऊ महिने राज्यात प्रशासन नाही. सत्तेचा गैरवापर करु नये तसेच लोकांनाही गृहित धरु नये हा धडा या निकालांमधून भाजपने घ्यावा, असा सल्लाही चोडणकर यानी दिला आहे.  

पणजीत काँग्रेसचा विजयोत्सवराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्त प्रदेश काँग्रेसने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी ५ च्या सुमारास येथील काँग्रेस भवनासमोर प्रदेश समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले व त्यांनी ‘काँग्रेस झिंदाबाद’, राहुल गांधी यांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. प्रदेश प्रवक्ते ऊर्फान मुल्ला, संकल्प आमोणकर तसेच जनार्दन भांडारी व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत ऊर्फान मुल्ला प्रदेश काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, ‘ परिवर्तनाच्या लाटेत भाजप वाहून गेला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेला होता व काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पहात होता परंतु लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवली. 

टॅग्स :goaगोवाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक