शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:44 IST

पक्ष देईल ती जबाबदार पार पाडणार असल्याचं उत्पल म्हणाले

पणजी : मी काय आहे ते पणजीवासीय आणि गोमंतकीय माझ्या कामावरून ठरवतील. माझ्या कामावरूनच माझी राजकीय पात्रता ठरेल. भाजपची वाढ ही स्वत: माझ्या घरापासून पाहिलेली आहे. भाजपने काहीही सांगितल्यास मी ते करेन, कोणतीही जबाबदारी पार पाडेन, असे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्पल हे निवडणुकीच्या राजकारणात येणार नाहीत, कारण ते पॉलिटीकल मटेरियल नव्हे पण ते सद्गृहस्थ आहेत अशा अर्थाचे भाष्य केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारताच उत्पल म्हणाले की खरे म्हणजे मला अशा विषयांवर भाष्य करायचेच नाही. तथापि, मी काय मटेरियल आहे हे लोकच निश्चित करतील. मी सदगृहस्थ आहे असेही सुरक्षा मंचाच्या नेत्याने म्हटलेय हेही माङयासाठी स्वागतार्ह आहे. मी काय आहे हे पणजीवासिय ठरवतील.उत्पल म्हणाले की भाजप हा माझ्यासाठी नवा नव्हे. भाजपाची सुरुवात आमच्या घरातूनच झाली. मी लहानातून जसा मोठा झालो, त्याच पद्धतीने समांतरपणे भाजपची वाढ झाली. प्रथम भाजपाकडे कार्यालय नव्हते. त्यामुळे आमच्या घरीच भाजपच्या बैठका व्हायच्या. मी तेव्हा लहान होतो. पण मी पाहिले आहे. सतीश धोंड वगैरे त्या बैठकांसाठी येत असे. मी त्यांना सतीश काका म्हणायचो. धोंड किंवा संजीव देसाई हे सगळे भाजपचे काम करत राहिले व त्यांचे काळे केस पांढरे झाले. काहीजणांचे काळे केस मात्र अलीकडेच पांढरे झाले आहेत.उत्पल म्हणाले, की एवढा काळ आपण सक्रिय राजकारणापासून दूर राहिलो होतो, कारण एक पर्रीकर ते काम करत असताना दुसऱ्याने दूर रहायला हवे. आपण राखलेले ते अंतर म्हणजे  स्ट्रॅटेर्जिकल कृती होती. मला आता भाजपने श्रीपाद नाईक यांच्यासाठी काम करायला सांगितल्याने मी काम सुरू केले आहे. पणजीच्या तिकिटाविषयी वगैरे मी बोलत नाही, कारण त्याविषयी काय ठरवायचे ते पक्ष ठरवील. पक्ष जे सांगेल, त्यानुसार मी काम करेन. पणजीत आणखी कुणाला तिकीट दिले तरी मी काम करेन.वेलिंगकर यांचे नाव न घेता उत्पल म्हणाले, की अलिकडे पर्रीकर यांना कुणीही शिव्या घालण्याची फॅशन आलेली आहे. पर्रीकर हे राष्ट्रीय नेते होते व त्यामुळे त्यांना दोष दिला की, आपली राष्ट्रीय बातमी होईल असे काहीजणांना वाटते. काहीजण हवेतच तत्त्वांच्या गोष्टी बोलतात. केवळ टीव्हीवर किंवा यू-ट्युबवर बातमी दिसावी म्हणूनच काहीजण बोलतात. ठोस असे काही न करता तत्त्वांविषयीच हवेतील बोल ते ऐकवतात. मला काँक्रीट असे म्हणजेच ठोस असे काही तरी करायचे आहे. मला भाजपचा अनुभव आहे, शिवाय मी अमेरिकेत शिकून आल्यानंतर एक उद्योग उभा करून अनेकांना रोजगार संधी दिली, तोही अनुभव माझ्या गाठीशी आहे. उत्पल म्हणाले की, पर्रीकर यांनी राजकारण शुद्ध असावे म्हणून प्रयत्न केला. ते स्वत: संरक्षण मंत्री असताना लाखो-कोटींचे बजेट ते हाताळत असे. तरीही आम्ही स्वच्छ राहिलो. मला अशा प्रकारच्याच शुद्धतेची जोड गोव्यातील राजकारणाला देण्यात यश आले तर ते मला समाधानाचे वाटेल. पर्रीकर आजारी असतानाही अखेरच्या काळातही ते गोव्यातील काही प्रकल्प पूर्ण करायचे आहेत याविषयी बोलायचे, चिंतन करायचे. तिसऱ्या मांडवी नदीवर पुलाचे बांधकाम होऊन त्याचे उद्घाटन झाल्यानंतर मग आपले काम संपले असे कदाचित पर्रीकर यांना वाटले असावे. कारण त्यानंतरच त्यांचे आरोग्य ढासळण्यास आरंभ झाला. पर्रीकर केवळ एकदाच पुलावर गेले. पण पुढील अनेक पिढ्यांसाठी तो पूल कायम राहिला आहे. मलाही असे कायमस्वरुपी काही करता आले तर ते योग्य ठरेल. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा