‘ओडीपीं’बाबत ‘पीडीए’ची लपवाछपवी

By Admin | Updated: July 22, 2015 01:23 IST2015-07-22T01:23:36+5:302015-07-22T01:23:46+5:30

पणजी : ताळगाव व म्हापसाच्या ‘ओडीपीं’बाबत किती सूचना व आक्षेप आले आणि ते कुणाकडून सादर झाले आहेत, याविषयी उत्तर गोवा नियोजन व

'PDA' hide behind 'ODP' | ‘ओडीपीं’बाबत ‘पीडीए’ची लपवाछपवी

‘ओडीपीं’बाबत ‘पीडीए’ची लपवाछपवी

पणजी : ताळगाव व म्हापसाच्या ‘ओडीपीं’बाबत किती सूचना व आक्षेप आले आणि ते कुणाकडून सादर झाले आहेत, याविषयी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) तूर्त लपवाछपवीच चालविली आहे. गेले अनेक दिवस पत्रकारांनी एनजीपीडीएचे अध्यक्ष तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना त्या विषयी वारंवार विचारणा केली,
तरीही लोबो अद्याप माहिती देऊ शकलेले नाहीत.
ताळगाव व म्हापसाचे ओडीपी खुले करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी सूचना व आक्षेप
सादर केले आहेत. ताळगावच्या
भाजप मंडळाने व राज्यातील वास्तूरचनाकारांच्या संघटनेने जाहीरपणे एनजीपीडीएला आपल्या सूचना दिलेल्या आहेत. वास्तूरचनाकार संघटनेच्या काही सूचना अधिक अभ्यासपूर्ण आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक, डिझाईनर्स, वास्तूरचनाकार यांनी व्यक्तिगत पातळीवरही एनजीपीडीएला सूचना सादर केल्या आहेत.
दरम्यान, पीडीएकडे किती सूचना आल्या त्याची माहिती आम्ही लवकरच खुली करू. सध्या सर्व सूचनांची
एक फाईल तयार केली जात आहे,
असे चेअरमन लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: 'PDA' hide behind 'ODP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.