पावा, विश्वकर्मा, विरापांडी विजेते
By Admin | Updated: July 7, 2016 02:38 IST2016-07-07T02:35:07+5:302016-07-07T02:38:16+5:30
पणजी : गोवा वन खात्याने ६७ व्या गोवा राज्य वनमहोत्सव-२०१६ च्या समारंभाानिमित्ताने ३ जुलै रोजी रन फॉर ट्री अशी

पावा, विश्वकर्मा, विरापांडी विजेते
पणजी : गोवा वन खात्याने ६७ व्या गोवा राज्य वनमहोत्सव-२०१६ च्या समारंभाानिमित्ताने ३ जुलै रोजी रन फॉर ट्री अशी ७ कि़ मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेस बावटा दाखवून सुरुवात केली होती. झाडांचे महत्त्व याचा प्रचार करण्यासाठी सुमारे ८७८ व्यक्तींनी या धाव स्पर्धेत भाग घेतला होता.
पुरुष गटात ३ टीटीआर, लष्करचे दिशिंग पावा यांना प्रथम स्थान प्राप्त झाले. तर म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाचे अजय विश्वकर्मा यांना दुसरे स्थान प्राप्त झाले. ६ टीटीआर लष्करचे विरापांडी एम. यांना तिसरे स्थान प्राप्त झाले. महिला गटात आरसीसी फातोर्डाच्या दनिता दिनीज यांना पहिले स्थान प्राप्त झाले. सुप्रिया विठोबा गावकर यांना दुसरे तर आरसीसी फातोर्डाच्या आयान सुवारीस यांना तिसरे स्थान प्राप्त झाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बालोद्यानात औषधी व एरोमेटिक झाडांची विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या विक्री काउंटरचे उद्घाटन केले. मिरामार येथे गोवा विज्ञान केंद्रासमोर
झाडे लावण्याचा कार्यक्रम झाला. वन तथा पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनप्रमुख अजय सक्सेना, सचिव सुधीर महाजन, आयजीपी सुनील गर्ग आणि इतरांनी या वेळी वृक्षारोपण केले.
(प्रतिनिधी)