दीनदयाळ योजनेत भागीदारी द्या!
By Admin | Updated: March 23, 2015 02:07 IST2015-03-23T02:02:35+5:302015-03-23T02:07:16+5:30
पणजी : खासगी इस्पितळांना सरकारच्या दीनदयाळ योजनेत भागीदार करून घ्या, अशी मागणी गोवा खासगी नर्सिंग होम संघटनेने

दीनदयाळ योजनेत भागीदारी द्या!
पणजी : खासगी इस्पितळांना सरकारच्या दीनदयाळ योजनेत भागीदार करून घ्या, अशी मागणी गोवा खासगी नर्सिंग होम संघटनेने केली आहे. पणजी येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
सरकारच्या आरोग्यविषयक योजना बनविताना खासगी इस्पितळांना विश्वासात घेण्यात यावे. दीनदयाळ स्वास्थ्य विमामध्ये खासगी इस्पितळांना भागिदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. संघटनेच्या आरोग्यविषयक डिरेक्टरी प्रसिद्ध करण्याच्या तसेच संघटनेच्या वेबसाइटचे उद््घाटन करण्याच्या कार्यक्रमात बोलताना संघटनेचे अध्यक्ष गोविंद कामत यांनी ही मागणी केली.
दीनदयाळ स्वास्थ्य हमी योजना सुरू होणार, असे आपण वृत्तपत्रातून ऐकत आहोत. प्रत्यक्षात ही योजना नेमकी काय आहे आणि कुठे पोहोचली आहे, याबद्दल ज्ञात नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या इविजार्डवर ही
योजना आॅनलाईन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.
आरोग्याशी संबंधितांनी ती अभ्यासावी, असे ते म्हणाले.
खासगी नर्सिंग होममध्ये राज्यातील ५० टक्के रुग्णांना आरोग्य सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील खासगी नर्सिंग होमची सर्वात प्रमुख समस्या आहे
ती बायोमेडिकल वेस्टची. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा अद्याप कार्यान्वित
नाही.
सरकारकडून यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे; परंतु अद्याप या कामाला गती घेतलेली नाही. तो लवकर पूर्ण करावा,
अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य खात्याचे संचालक संजीव दळवी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)