शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पणजीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपाचे शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:07 IST

मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत

ठळक मुद्देमनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.पणजीत जिंकायलाच हवे अशा इर्षेने भाजपा लढत आहे. विशेषत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील लढत ही स्वत: साठी अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. पणजीत जिंकायलाच हवे अशा इर्षेने भाजपा लढत आहे. विशेषत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील लढत ही स्वत: साठी अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.

पणजी हा पंचवीस वर्षे भाजपाचा बालेकिल्ला बनून राहिला. गोव्यातील चाळीसपैकी एकही मतदारसंघ असा पंचवीस वर्षे बालेकिल्ला कधी बनून राहिला नाही. फक्त पणजीचाच अपवाद आहे. 1994 सालापासून पणजी मतदारसंघात मनोहर पर्रीकर सातत्याने जिंकत आले. त्यांनी पणजीत जिंकण्याचा विक्रमच केला. पर्ये मतदारसंघात काँग्रेसचे प्रतापसिंग राणे कधीच पराभूत झाले नाहीत आणि पणजीत पर्रीकर कधी हरले नाहीत. मात्र यावेळी पर्रीकर हयात नसताना प्रथमच भाजपा पणजीत निवडणुकीस सामोरा जात आहे. यामुळे स्थिती थोडी वेगळी आहे. पर्रीकर यांची उणीव भरून काढण्यासाठी भाजपाने पर्रीकर यांच्या दोन्ही पुत्रांना पणजीत प्रचार काम करण्यास सांगितले. त्यामुळे उत्पल आणि अभिजात हे दोन्ही पुत्र प्रचार काम करत आहेत. रायबंदर व मळा या भागात हे दोघेही फिरून भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही अतिशय जुने कार्यकर्तेही मनोहर पर्रीकर यांची आठवण काढतात तेव्हा पर्रीकर यांच्या मुलांना गहीवरून येते.

येत्या 19 रोजी पणजीसाठी मतदान होणार आहे. पणजीत काँग्रेसतर्फे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात हे लढत आहेत. मोन्सेरात हे एकदा पणजीत पराभूत झालेले आहेत पण यावेळी प्रथमच ते काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत. पणजीत मतदारांची एकूण संख्या बावीस हजार आहे व त्यात साडेसहा हजार ख्रिस्ती आणि दीड हजार मुस्लिम धर्मिय मतदार आहेत. यशाची आपली परंपरा भाजपा कायम राखू शकेल काय या प्रश्नाचे उत्तर येत्या 23 रोजी मतमोजणीवेळी मिळेल.

गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले

पोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला आणि स्वतंत्र गोव्यात 1963 साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळपासून आजपर्यंतच्या कालावधीत पणजी मतदारसंघातून जे आमदार निवडून आले, ते सगळे विधानसभेत कायम सक्रिय राहिल्याचे दिसून येते. अभ्यासू, सुशिक्षित आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रतही सक्रिय राहिलेलेच नेते पणजीतून बहुतांशवेळा निवडून येऊन विधानसभेत पोहचले.

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या नावावर तर मोठा विक्रम आहे. 1994 सालापासून ते सलगपणो पणजी मतदारसंघातून निवडून आले व विधानसभा त्यांनी गाजवली. ते एकमेव पणजीचे आमदार असे ठरले, जे मुख्यमंत्री बनले. अन्यथा पणजीहून निवडून आलेला कुणीच आमदार त्यांच्यापूर्वी कधी राज्याचा मुख्यमंत्री बनला नाही. पर्रीकर पुढे देशाचे संरक्षण मंत्रीही बनले. पणजी हा सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून गोव्यात ओळखला जातो. स्वत: पर्रीकर हे आयआयटी पदवीधर होते. पोर्तुगीजांच्या काळात पणजीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेला जुनेगोवे हा भाग गोव्याची राजधानी होता. जुनेगोवेमध्ये प्लेगची साथ आल्यानंतर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पणजीमध्ये आपले मुख्यालय हलविले. त्यावेळपासून पणजी ही गोव्याची राजधानी बनली. पणजीला पूर्वी नोवा गोवा या नावानेही ओळखले जात होते.  

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस