गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:52 PM2019-05-14T13:52:21+5:302019-05-14T13:59:59+5:30

पोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला आणि स्वतंत्र गोव्यात 1963 साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली.

Panaji has got active MLAs | गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले

गोवा मुक्तीपासून कायम पणजीला सक्रिय आमदार लाभले

Next
ठळक मुद्देपोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला आणि स्वतंत्र गोव्यात 1963 साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली. आजपर्यंतच्या कालावधीत पणजी मतदारसंघातून जे आमदार निवडून आले, ते सगळे विधानसभेत कायम सक्रिय राहिल्याचे दिसून येते. अभ्यासू, सुशिक्षित आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रतही सक्रिय राहिलेलेच नेते पणजीतून बहुतांशवेळा निवडून येऊन विधानसभेत पोहचले.

पणजी - पोर्तुगीजांच्या राजवटीतून 1961 साली गोवा मुक्त झाला आणि स्वतंत्र गोव्यात 1963 साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळपासून आजपर्यंतच्या कालावधीत पणजी मतदारसंघातून जे आमदार निवडून आले, ते सगळे विधानसभेत कायम सक्रिय राहिल्याचे दिसून येते. अभ्यासू, सुशिक्षित आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रतही सक्रिय राहिलेलेच नेते पणजीतून बहुतांशवेळा निवडून येऊन विधानसभेत पोहचले.

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या नावावर तर मोठा विक्रम आहे. 1994 सालापासून ते सलगपणो पणजी मतदारसंघातून निवडून आले व विधानसभा त्यांनी गाजवली. ते एकमेव पणजीचे आमदार असे ठरले, जे मुख्यमंत्री बनले. अन्यथा पणजीहून निवडून आलेला कुणीच आमदार त्यांच्यापूर्वी कधी राज्याचा मुख्यमंत्री बनला नाही. पर्रीकर पुढे देशाचे संरक्षण मंत्रीही बनले. पणजी हा सुशिक्षितांचा मतदारसंघ म्हणून गोव्यात ओळखला जातो. स्वत: पर्रीकर हे आयआयटी पदवीधर होते. पोर्तुगीजांच्या काळात पणजीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेला जुनेगोवे हा भाग गोव्याची राजधानी होता. जुनेगोवेमध्ये प्लेगची साथ आल्यानंतर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पणजीमध्ये आपले मुख्यालय हलविले. त्यावेळपासून पणजी ही गोव्याची राजधानी बनली. पणजीला पूर्वी नोवा गोवा या नावानेही ओळखले जात होते.  

येत्या 19 मे रोजी पणजी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतरची पणजीतील ही पहिली निवडणूक आहे. 1963 सालच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत जॅक सिक्वेरा हे पणजीचे आमदार बनले. ते त्यावेळी मगो पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते. मगो पक्षातर्फे गोविंद धुमे यांनी निवडणूक लढवली होती. युजी पार्टीतर्फे जॅक सिक्वेरा लढले होते. युजीचे जॅक सिक्वेरा जिंकले तरी गोव्यात सरकार मात्र मगो पक्षाचे स्थापन झाले. सिक्वेरा हेही उच्चशिक्षित व अभ्यासू होते व त्यांनी गोवा विधानसभा गाजवली. 1967 साली दुसरी विधानसभा निवडणूक झाली व त्यावेळी पणजी मतदारसंघातून पहिला हिंदू आमदार निवडून आला. त्यांचे नाव होते यशवंत देसाई आणि तेही युजी पक्षातर्फेच जिंकले. पणजीत वारंवार कुणीच निवडून आले नाही. काहीजण एकदाच तर काहीजण दोनवेळा निवडून आले पण मनोहर पर्रीकर हेच एकटे सातत्याने म्हणजे 1994 पासून 2017 सालापर्यात सातत्याने पणजीतून निवडून आले.

 

Web Title: Panaji has got active MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.