कुंकळ्येकरांसाठी पर्रीकरांची बॅटिंग
By Admin | Updated: February 6, 2015 01:43 IST2015-02-06T01:42:16+5:302015-02-06T01:43:31+5:30
पणजी : वेळ गुरुवारी सायंकाळी सहाची. स्थळ मळा-पणजी. एक खासगी कार हेडगेवार हायस्कूलसमोरील जागेत येते.

कुंकळ्येकरांसाठी पर्रीकरांची बॅटिंग
पणजी : वेळ गुरुवारी सायंकाळी सहाची. स्थळ मळा-पणजी. एक खासगी कार हेडगेवार हायस्कूलसमोरील जागेत येते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्या गाडीतून खाली उतरतात. भाजपचे विविध वयोगटांतील कार्यकर्ते हायस्कूल परिसरात अगोदरच अर्धा तास थांबलेले असतात. मात्र, या कारमधून देशाचे संरक्षणमंत्री पर्रीकर येतील, याची कुणालाच कल्पना नसते. पर्रीकरांसोबत भाजपचे पणजीतील उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे गाडीतून खाली उतरतात आणि भाजपचे कार्यकर्ते व मळा भागातील नागरिक त्यांच्याभोवती गर्दी करतात. संरक्षणमंत्री आता प्रत्येकाच्या घरी भेट देणार आहेत, या भावनेनेच मळावासीय व पणजीवासियांचे चेहरे खुलतात...
पुरुष व महिला कार्यकर्त्यांनीही पर्रीकर यांना गराडा घातला. पर्रीकरांसोबत सगळेजण फोटो काढून घेऊ लागले. ‘सेल्फी’चा अनुभव पर्रीकर घेऊ लागले. ‘सेल्फी घेता की काय,’ पर्रीकरांनी हसत हसत विचारले. मळ्यातील अनेक हिंदू व ख्रिस्ती नागरिक पुढे
येऊन पर्रीकर यांच्याशी हस्तांदोलन करू लागले.
संरक्षणमंत्री बनल्यानंतर पर्रीकर प्रथमच ‘होमग्राउंड’वर येत असल्याचे पाहून पणजीवासियांचे चेहरे फुलले असल्याचे पाहायला मिळाले. हायस्कूलसमोरच पर्रीकर यांनी प्रथम बैठक घेतली. आपण पणजीवासियांशी संबंध व संपर्क कायम ठेवीन. पणजीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देईन, अशी ग्वाही पर्रीकर यांनी दिली.
२0 वर्षांपूर्वी पणजीत प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा ४ हजार ६०० मते मिळवली होती. २०१२ साली निवडणूक लढविली, तेव्हा ११ हजार मते मिळविली. आता भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर हे रिंगणात असून मतांचे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. त्यानंतर, ‘भाजपचा विजय असो, सिद्धार्थ तुम आगे बढो,
भार्इंचा विजय असो,’ अशा
घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी वातावरणात जोष भरला.
(खास प्रतिनिधी)