पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत जाणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:29 IST2018-03-06T05:29:52+5:302018-03-06T05:29:52+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांना मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी चर्चेनंतर ते अमेरिकेला जाणार आहेत.

 Parrikar goes to America for treatment | पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत जाणार  

पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत जाणार  

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांना मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी चर्चेनंतर ते अमेरिकेला जाणार आहेत.
उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याची कल्पना त्यांनी सर्व मंत्री, आमदार व पक्षाच्या कोअर टीमला सोमवारी दिली आहे. त्यांनी पदाचा कार्यभार कोणाकडेही दिलेला नाही. पण सुदिन ढवळीकर, फ्रान्सिस डिसोझा व विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती नेमून पाच कोटी रुपयांपर्यंतच्या सरकारी कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार त्यांनी दिला.
पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी दोनापावल येथील निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मंत्री, भाजपाचे आमदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. उपसभापती मायकल लोबो हेही पर्रीकर यांच्यासोबत वीस मिनिटे होते.

Web Title:  Parrikar goes to America for treatment