शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पर्रीकरांनी आयपीबीची बैठक घेतलीच नाही, काँग्रेसचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 20:48 IST

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे सांगण्यात येत असलेली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झालीच नसल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

पणजी - मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे सांगण्यात येत असलेली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झालीच नसल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाल्याचा पक्षाचा दावा खरा ठरविणारी व्हीडिओ क्लिपिंग भाजपने सादर करावी असे आव्हान त्यांनी दिले आहे. गंभीररित्या आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचे विडिओ कॉन्फरन्सिंगद्वार यजमानपद भूषविले असे सांगून सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. तसेच आजारी मुख्यमंत्र्यांच्या आजाराचाही गैरफायदा घेत आहे असा आरोप त्यांनी केला. बैठक वगैरे काहीच झालेली नाही. केवळ सुटकेस ते सुटकेस व्यवहार झाले असतील. आपला फायदा पाहून  पैशेवाल्यांचे प्रस्ताव मंजूर केल्याचाही आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे आणि कोणत्या परिस्थितीत त्यांना दिल्लीहून गोव्यात आणले गेले  हे जनतेने पाहिले आहे. त्यांचे एक छायाचित्रही घेण्याची परवानगी पत्रकारांना नाही. ते बैठक घेण्याच्या परिस्थितीत मुळीच नाहीत हे स्पष्ट असताना ही लपवाछपवी कशासाठी करीत आहात असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आजाराचा गैर फायदा सध्या पक्षातील आणि सरकारातील लोकांकडून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विकासासाठी आमदारकीचा राजीनामा दिला म्हणणाºया दयानंद सोपटे  हे लोकांना  फसविण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत, परंतु लोक त्यांना पुरते ओळखून चुकले आहेत. भाजप सरकारने मांद्रेत १०५ नोकºया दिल्याचा दावा करणाºया सोपटे यांनी ही १०५ नावे जाहीर करावी असे आव्हानही पणजीकर यांनी दिले. जिथे भाजपचे आमदार आणि मंत्रीच आपल्याला पाच नोकºयाही दिल्या नसल्याची तक्रार करतात तिथे सोपटेना १०५ नोकºया कोठून मिळाल्या असा प्रश्न त्यांनी केला. सुभाष   शिरोडकर यांना मिळालेले ७० कोटी रुपये कायदेशीर असते तर त्यांना आमदारकी सोडावी का लागली याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा