शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 16:25 IST

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले

पणजी - राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी भाजपकडे कोणताही तोडगा नाही. २०१२ मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपनेच खाणी बंद केल्या. हा पक्ष यावर मुळीच तोडगा काढू शकणार नाही, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. यतिश नायक यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. 

ते म्हणाले की, बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले. जीएसटी, नोटाबंदीने खाजगी उद्योगही मारून टाकले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती  त्याची पुनरावृत्ती आता केली जात आहे. २०१४ मध्येही खाणी सुरू करू, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. परंतु आज २०१९ उजाडला तरी हे आश्वासन भाजप पूर्ण करू शकला नाही. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला गोव्याचा मतदार मूर्ख नव्हे, असे नायक म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की 'खाण प्रश्न सोडवणार असे आश्वासन देणाऱ्या भाजपने हा प्रश्न नेमका कसा सोडवणार? त्यांच्याकडे काय तोडगा आहे? हे स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणि स्पष्टता भाजपकडे नाही. आज लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खाण पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये फिरतात तेव्हा त्यांना अवलंबित याचा जाब विचारतात, परंतु भाजपच्या या उमेदवारांकडे उत्तर नसते. मध्यंतरी अवलंबितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रश्नावर केवळ 'देखता हूँ', असे म्हणून बोळवण केली.

केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत खाण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल नायक यांनी केला. भाजप जनतेकडे खोटारडेपणा करत आहे. लोकांची फसवणूक करत आहे, असे आरोप त्यांनी केले. देशभरात जीएसटी, नोटाबंदी आणून भाजपने खाजगी क्षेत्रही मारून टाकले. यामुळे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नायक यांनी केला. ते म्हणाले की, 'अच्छे दिन आयेंगे', असे २०१४ च्या निवडणुकीत भाजप म्हणत होता. आता अच्छे दिन आलेही म्हणत नाही आणि अच्छे दिन येतील असे म्हणत नाही. आता त्यांनी 'चौकीदारा'चा जयघोष चालवला आहे, अशी टीका करत लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा काँग्रेस उमेदवारच जिंकतील, असा दावा नायक यांनी केला. केंद्रात आणि कालांतराने राज्यातही काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय पै, साळगांव गटाध्यक्ष अतुल नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर