शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आता लवकरच एफआयआरही ‘रिअल टाईम’वर, गोव्यातील पोलीस स्थानके होणार पेपरलेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 20:38 IST

पेपरलेस पोलीस स्थानक ही संकल्पना आता तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर गोव्यातही लागू होण्याच्या मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणजे आतार्पयत पोलीस मुव्हमेंट रजिस्टर ज्याला नेहमीच्या भाषेत पोलीस डायरी असे म्हटले जाते ती डायरी आता ऑनलाईन झाली आहे.

 - सुशांत कुंकळयेकर 

मडगाव - पेपरलेस पोलीस स्थानक ही संकल्पना आता तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर गोव्यातही लागू होण्याच्या मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणजे आतार्पयत पोलीस मुव्हमेंट रजिस्टर ज्याला नेहमीच्या भाषेत पोलीस डायरी असे म्हटले जाते ती डायरी आता ऑनलाईन झाली आहे. येत्या काही महिन्यात इतर कागदपत्रेही ऑनलाईन होणार असून लोकांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि गुन्हेगारावर दाखल करण्यात आलेली आरोपपत्रेही ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक पंकजकुमार सिंग यांनी याबद्दल बोलताना, या पद्धतीमुळे पूर्ण पोलीस प्रशासनात पारदर्शकता येण्याबरोबरच लिखापढी कमी झाल्यामुळे वेळही वाचेल आणि या वाचलेल्या वेळाचा इतर कामासाठी उपयोग होऊ शकेल असे मत व्यक्त केले.क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्किग सिस्टम (सीसीटीईएनएस) या योजनेखाली जूनच्या 1  तारखेपासून पोलीस डायरी रियल टाईम जनरल डायरी बनली आहे. सोप्या अर्थात सांगायचे झाल्यास ज्यावेळी या डायरीची नोंद केली जाते ती वेळ या यंत्रणोत आपोआप नोंद होते. एवढेच नव्हे तर या नोंदी कुणी केल्या त्याचीही नोंद होते. यामुळे यापुढे पोलीस डायरीत फेरफार हा प्रकार कमी होणार आहे. त्यामुळे यापूर्वी हाती लिहिल्या जाणा:या डाय:यात फेरफार करुन जसा दुरुपयोग केला जायचा तो बंद होणार आहे. एवढेच नव्हे तर नोंद करणा:यांच्या नावाचीही नोंद आता होणार असल्याने मुद्दामहून डायरीत फेरफार करण्यास कुणी धजावणारही नाही.याबद्दल बोलताना सिंग म्हणाले, ही यंत्रणा वापरण्यासाठी प्रत्येकाला युजर आयडी आणि पासवर्ड दिला असल्यामुळे दुसरा कुणी यात फेरफार करु शकणार नाही. एवढेच नव्हे तर नेमक्या कोणत्यावेळी ही डायरी लिहिली गेली याचीही नोंद होणार असून सर्व पोलीस वरिष्ठांना आता ती पहाता येणो शक्य असल्याने पोलीस प्रशासनातील शिस्तही वाढणार आहे.एवढेच नव्हे तर न्यायालयातही या डायरीचा पुरावा म्हणून वापर करता येणो शक्य आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही पद्धती वाळपई, कुळे, वास्को रेल्वे पोलीस आणि दाबोळी विमानतळ पोलीस या चार पोलीस स्थानकावर राबविली गेली होती. त्यानंतर आता गोव्यातील 43ही पोलीस स्थानकात ही पद्धती सुरु झाली आहे. लवकरच पोलीस स्थानकात नोंद होणा:या एफआयआर्स, गुन्हेगारावर दाखल केली जाणारी आरोपपत्रे अशा सर्व बाबी रियल टाईम यंत्रणोखाली आणल्या जाणार आहेत. यासाठी आणखी चार-पाच महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र ती पद्धती सुरु झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीने कधी एफआयआर दिली याची अचूक नोंद उपलब्ध होणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना सिंग म्हणाले, आताही आम्ही एफआयआर आणि इतर मजकूर ऑनलाईनवर लोड करतो. मात्र त्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने म्हणजे टाईप करुन पार पाडली जाते. नवीन यंत्रणोत ती परस्पर ऑनलाईनवर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पोलीस स्थानके ख:या अर्थाने पेपरलेस बनतील आणि त्यामुळे पोलीस कर्मचा:यांचे श्रमही ब:याच प्रमाणात कमी होणार आहेत.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस