पणजीतही जगन्नाथ रथयात्रा
By Admin | Updated: July 7, 2016 02:38 IST2016-07-07T02:35:55+5:302016-07-07T02:38:04+5:30
पणजी : ओडिशा-पुरी येथे होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्त पणजीत देखील जगन्नाथ रथयात्रेचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजीतही जगन्नाथ रथयात्रा
पणजी : ओडिशा-पुरी येथे होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्त पणजीत देखील जगन्नाथ रथयात्रेचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर यांच्या हस्ते पूजा करून व झाडू मारून मिरामार येथून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली.
‘हरे कृष्णा हरे रामा’ या गजरात जगन्नाथ भक्तांनी भजने गाऊन मिरामार ते पणजी सांता जेटीपर्यंत रथाची दोरी ओढत रथयात्रा काढली. या वेळी जगन्नाथाच्या मूर्ती ठेवून फुलांनी रथ सजविण्यात आला होता. श्री जगन्नाथ मंदिर ट्रस्ट गोवा, अखिल गोवा ओडिया संघटना आणि इस्कॉन यांच्यातर्फे हा रथयात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुरी येथे मोठ्या भक्तिभावाने मनविण्यात येणारा हा कार्यक्रम जगभरात विविध ठिकाणी ओडिया समाज स्थायिक होतो तेथे रथयात्रा काडून मनविण्यात येतो. नोकरी, व्यवसायानिमित्त ओडिशातून गोव्यात स्थायिक झालेल्या लोकांनी संघटन केले असून या संघटनेतर्फे दरवर्षी हा रथयात्रेचा कार्यक्रम होतो. तसेच शेकडो लोक या रथयात्रेत सहभागी होतात.
सुरुवातीला मिरामार येथे भक्तांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. तसेच जेटीजवळ देखील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. लहान मुलांना जगन्नाथांच्या मूर्तीला टेकवून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. तसेच जय जगन्नाथ या जयघोषाने पणजी दुमदुमून गेली. महाआरती होऊन रथयात्रेची सांगाता झाली.
(प्रतिनिधी)