पणजीत वाहतूक कोंडी

By Admin | Updated: May 27, 2016 02:53 IST2016-05-27T02:51:32+5:302016-05-27T02:53:40+5:30

पणजी : अग्निशामक दलाने राजधानी शहरात गुरुवारी अचानक झाडांच्या फांद्या कापण्याचे काम हाती घेतल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

Panaji Traffic Dodge | पणजीत वाहतूक कोंडी

पणजीत वाहतूक कोंडी

पणजी : अग्निशामक दलाने राजधानी शहरात गुरुवारी अचानक झाडांच्या फांद्या कापण्याचे काम हाती घेतल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रखरखत्या उन्हात दुचाकीस्वारांचे हाल झाले.
आंबेडकर उद्यानाजवळ सकाळी ११.३0 च्या सुमारास झाडे कापण्याचे काम सुरू होते त्यामुळे शहरातून बाहेर पडणारी वाहतूक तुंबली आणि मोठी कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना नाकीनऊ आले. आधीच कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना या वाहतूक कोंडीत सापडलेल्या दुचाकीस्वारांना घामाच्या धारा लागल्या.
रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे काम अग्निशामक दलाने कोणतीही पूर्वसूचना न देता हाती घेतले त्यामुळे वाहनधारकांनी या दलाच्या नावाने बोटे मोडली. दुपारी उशिरापर्यंत शहरात सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आंबेडकर उद्यानाजवळ मोठ्या फांद्या कापल्याने वाहतूक बराच वेळ तुंबली.
जुन्या पाटो पुलावरून पुढे येऊन शहराबाहेर पडू पाहणाऱ्या वाहनधारकांना रुची हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागले. स्थिती वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेली.
(प्रतिनिधी)

Web Title: Panaji Traffic Dodge