पणजी-रायबंदर कॉजवे समांतर पूल होणार

By Admin | Updated: May 30, 2014 02:22 IST2014-05-30T02:21:35+5:302014-05-30T02:22:41+5:30

पणजी : पणजी-रायबंदर कॉजवेला समांतर पूल बांधण्याची सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

Panaji-Ribandar Causeway parallel bridge | पणजी-रायबंदर कॉजवे समांतर पूल होणार

पणजी-रायबंदर कॉजवे समांतर पूल होणार

पणजी : पणजी-रायबंदर कॉजवेला समांतर पूल बांधण्याची सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. हा पूल झाल्यानंतर सध्याचा कॉजवे पादचारी व सायकलींसाठी वापरला जाईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांचे येथील भाजप मुख्यालयात आगमन झाले, त्या वेळी स्वागतासाठी ते उपस्थित होते. २ जून रोजी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर एका कार्यक्रमासाठी गोव्यात येत असून त्यांच्याकडे बफर झोनच्या बाबतीत असलेली मागणी तसेच कस्तुरिरंगन अहवालाच्या आधारे केंद्राने काढलेल्या अधिसूचनेबाबत राज्याचे असलेले मत मांडले जाईल. ३ जून रोजी आपण दिल्लीला जाणार असून सुमारे १५ मागण्या आहेत. त्यापैकी दोन ते तीन महत्त्वाच्या मागण्या आपण या भेटीत मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोकळे असल्यास त्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करीन, असे पर्रीकर म्हणाले. दिल्ली भेटीत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांबाबतचा विषयही मांडणार आहे. गोव्यासाठी स्वतंत्र केडरचा पाठपुरावा केला जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Panaji-Ribandar Causeway parallel bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.