पणजी मनपा निवडणूक ६ मार्चला शक्य
By Admin | Updated: December 23, 2015 01:49 IST2015-12-23T01:49:14+5:302015-12-23T01:49:27+5:30
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीची नियोजित १३ मार्च ही तारीख बदलावी लागणार असून ती आता ५ मार्च ते ७

पणजी मनपा निवडणूक ६ मार्चला शक्य
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीची नियोजित १३ मार्च ही तारीख बदलावी लागणार असून ती आता ५ मार्च ते ७ मार्च या दरम्यान ठेवावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. दि. ६ रोजी रविवार असल्यामुळे ६ मार्च रोजी या निवडणुका होण्याची अधिक शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने न्या. एफ. एम. रेईस आणि सी. एल. भदंग यांच्या खंडपीठासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पणजी महापालिकेची निवडणूक ही निश्चित केलेल्या १३ मार्च २०१६ ऐवजी ५ ते ७ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
(पान ४ वर)