पणजी महापालिकेच्या कामगारांचा संप मागे
By Admin | Updated: July 10, 2015 01:40 IST2015-07-10T01:40:27+5:302015-07-10T01:40:34+5:30
पणजी : गेले चार दिवस महापालिका व कामगारांतील संघर्षामुळे पणजीत उद्भवलेली कचराकोंडी अखेर सुटली. गुरुवारी रात्री उशिरा कामगारांनी संप मागे घेतला. शुक्रवारपासून शहरातील कचरा उचलण्यास कामगार राजी झाले.

पणजी महापालिकेच्या कामगारांचा संप मागे
पणजी : गेले चार दिवस महापालिका व कामगारांतील संघर्षामुळे पणजीत उद्भवलेली कचराकोंडी अखेर सुटली. गुरुवारी रात्री उशिरा कामगारांनी संप मागे घेतला. शुक्रवारपासून शहरातील कचरा उचलण्यास कामगार राजी झाले.
भर पावसाळ्यात पणजीत कचरा कुजू लागल्याने नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत होती. संप मिटविल्याचे श्रेय कुणी घ्यावे, याबाबतही काही राजकारण्यांमध्ये व कामगार नेत्यांमध्येही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र होते. या कालावधीत महापालिका कचरा उचलण्यासाठी पर्यायी कामगारही जास्त संख्येने आणू शकली नाही. महापौर शुभम चोडणकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर व कामगार नेते अजितसिंग राणे यांनी ठरविले असते, तर चार दिवस संप चाललाच
नसता. (खास प्रतिनिधी)