पणजीतील कचरा कंपोस्टिंगचे आउटसोर्सिंग
By Admin | Updated: November 29, 2014 01:01 IST2014-11-29T00:59:36+5:302014-11-29T01:01:03+5:30
पणजी : पाटो, एलआयसीजवळील तसेच मार्केटमधील कचरा कंपोस्टिंगचे काम आउटसोर्स करून खासगी क्षेत्राकडे सोपविण्याचा प्रस्ताव महापालिका

पणजीतील कचरा कंपोस्टिंगचे आउटसोर्सिंग
पणजी : पाटो, एलआयसीजवळील तसेच मार्केटमधील कचरा कंपोस्टिंगचे काम आउटसोर्स करून खासगी क्षेत्राकडे सोपविण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी शुक्रवारी मनपाच्या बैठकीत मांडला. नगरसेवकांनी त्यास मान्यता दिल्यामुळे लवकरच हे काम आउटसोर्स केले जाणार आहे. दरम्यान, मनपात नवी कामगार संघटना स्थापन करण्यात काही नगरसेवकांचीच फूस असल्याचा गंभीर आरोप आयुक्तांनी
केल्याने महापौर सुरेंद्र फुर्तादो व आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली.
नवी कामगार संघटना स्थापन करण्यास काही नगरसेवकांचीच फूस असल्याचा गंभीर आरोप आयुक्त रॉड्रिग्स यांनी केल्यावर महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि त्यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. कोणी फूस लावली ते नाव घेऊन सांगा, हवेत आरोप करू नका, असे फुर्तादो यांनी बजावले. कामगारांचा संप चालू होता, तेव्हा तुम्ही दौरे करीत होता. प्रकरण मी हाताळले, असे फुर्तादो म्हणाले. तेव्हा माझ्याकडे कामगारांना कोणी फूस लावली, याचे सर्व पुरावे आहेत. मी पुढील बैठकीत माहिती सादर करीन, असे आयुक्त म्हणाले. या घटनेनंतर कामगार पर्यवेक्षकांचे किंवा वरिष्ठांचे ऐकत नाहीत. मनमानी कारभार करीत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
कचऱ्याचा प्रश्न चर्चेला आला तेव्हा संजित म्हणाले की, पाटो येथील कचरा प्रकल्पावर सध्या मोठा ताण आहे. तीन शेड उभारल्या, तरी अपुऱ्या पडतात. कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
(पान २ वर)