मडकईत अपघातानंतर उद्रेक
By Admin | Updated: July 1, 2015 00:52 IST2015-07-01T00:52:16+5:302015-07-01T00:52:18+5:30
फोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा,

मडकईत अपघातानंतर उद्रेक
फोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा, अशी मागणी लावून धरून संतप्त नागरिकांनी तब्बल पाच तास रास्तारोको केला. म्हार्दोळ जंक्शन येथील महामार्गही संतप्त नागरिकांनी अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक, तसेच प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या आश्वासनानंतर जमावाने मृतदेह हलवण्यास परवानगी दिली. या गोंधळात सव्वादहाच्या सुमारास गतप्राण झालेल्या गोकुळदास नाईक गुरव यांच्या मृतदेहाची सुमारे पाच तास परवड झाली. दरम्यान, पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली.
कानेऱ्या-मडकई (कायतान बारजवळ) येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. मृताचे नाव गोकुळदास नाईक गुरव (वय ५५, रा. प्रियोळ) असे आहे. सकाळी सव्वादहाच्या सुमारास गोकुळदास नाईक मुळवी हे आपल्या जीए ०५-ई ९२१३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मडकईमार्गे वास्कोला निघाले होते. ते नौदलात नोकरीला होते. कानेऱ्या-मडकई येथील चढणीवर ते पोहोचले असता मडकई औद्योगिक वसाहतीतून दगड घेऊन खाली येत असलेल्या जीए ०८-यू ००८४ या ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी ट्रकचालकाला अटक करून घटनास्थळी आणण्याची मागणी केली. अपघाताचे वृत्त कळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, तसेच उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, गौतम शेटकर, अक्षय पार्सेकर, मार्लन डिकॉस्ता, पांडुरंग गावडे, रामचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त जमावाने मृतदेह हलविण्यास हरकत घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक बेकायदेशीरपणे दगड वाहतूक करीत असल्याचा दावा करून स्थानिकांनी ट्रकची समोरील चाके पंक्चर केली. कोणत्याही परिस्थितीमडकईत अपघातानंतर उद्रेक
फोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा, अशी मागणी लावून धरून संतप्त नागरिकांनी तब्बल पाच तास रास्तारोको केला. म्हार्दोळ जंक्शन येथील महामार्गही संतप्त नागरिकांनी अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक, तसेच प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या आश्वासनानंतर जमावाने मृतदेह हलवण्यास परवानगी दिली. या गोंधळात सव्वादहाच्या सुमारास गतप्राण झालेल्या गोकुळदास नाईक गुरव यांच्या मृतदेहाची सुमारे पाच तास परवड झाली. दरम्यान, पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली.
कानेऱ्या-मडकई (कायतान बारजवळ) येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. मृताचे नाव गोकुळदास नाईक गुरव (वय ५५, रा. प्रियोळ) असे आहे. सकाळी सव्वादहाच्या सुमारास गोकुळदास नाईक मुळवी हे आपल्या जीए ०५-ई ९२१३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मडकईमार्गे वास्कोला निघाले होते. ते नौदलात नोकरीला होते. कानेऱ्या-मडकई येथील चढणीवर ते पोहोचले असता मडकई औद्योगिक वसाहतीतून दगड घेऊन खाली येत असलेल्या जीए ०८-यू ००८४ या ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी ट्रकचालकाला अटक करून घटनास्थळी आणण्याची मागणी केली. अपघाताचे वृत्त कळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, तसेच उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, गौतम शेटकर, अक्षय पार्सेकर, मार्लन डिकॉस्ता, पांडुरंग गावडे, रामचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त जमावाने मृतदेह हलविण्यास हरकत घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक बेकायदेशीरपणे दगड वाहतूक करीत असल्याचा दावा करून स्थानिकांनी ट्रकची समोरील चाके पंक्चर केली. कोणत्याही परिस्थितीत ट्रकचालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.
मडकईत वातावरण तापलेले असतानाच म्हार्दोळ येथील जंक्शनवर सुमारे दीडशे-दोनशे नागरिकांनी महामार्ग अडविल्याने कोंडी झाली. (पान ९ वर)त ट्रकचालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.
मडकईत वातावरण तापलेले असतानाच म्हार्दोळ येथील जंक्शनवर सुमारे दीडशे-दोनशे नागरिकांनी महामार्ग अडविल्याने कोंडी झाली. (पान ९ वर)