‘पब’ला विरोध करणाऱ्यांचे

By Admin | Updated: July 15, 2014 01:14 IST2014-07-15T01:13:35+5:302014-07-15T01:14:51+5:30

पणजी : पब संस्कृतीला विरोध करणाऱ्या भाजप, तसेच मंत्र्यांचे कॅसिनोंना समर्थन कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला आहे.

Opponents of 'Pub' | ‘पब’ला विरोध करणाऱ्यांचे

‘पब’ला विरोध करणाऱ्यांचे

पणजी : पब संस्कृतीला विरोध करणाऱ्या भाजप, तसेच मंत्र्यांचे कॅसिनोंना समर्थन कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला आहे.
याबाबतीत भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेले दोन आठवडे पब संस्कृतीच्या वृत्तांनी जगभरात गोव्याबाबत चुकीचा संदेश गेला आहे. आधी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व पाठोपाठ केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पब संस्कृतीविरोधात भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. गोवा जगभरात नाईट लाईफ, बार व पबसाठी प्रसिद्ध आहे. श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्रकारांनी कॅसिनोचा विषय उपस्थित केला असता, हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट करून त्यांनी हात झटकले होते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने कॅसिनोंबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
भाजपचे आमदार, मंत्री विदेशवाऱ्या करतात. अलीकडे तर पाचजण ब्राझील दौरा करून आले. विदेशी संस्कृतीविरुद्ध नाक मुरडणाऱ्यांना विदेश दौरे कसे चालतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
२0१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकरांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने तर कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे उघड केले आहे. गेल्या वर्षी सालभरात ३0४८ कोटी रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाली आणि चोरीचा माल हस्तगत करण्याचे प्रमाण केवळ 0.१ टक्के इतके आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. गृह खाते पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे यातून स्पष्ट होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Opponents of 'Pub'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.