शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:43 IST

ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत.

पणजी: शिक्षण खात्याने राज्यात कुठेच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही. ऑनलाईन शिक्षणाविषयी समस्या येतात याची कल्पना सरकारला आहे. मात्र मोबाईल टॉवरला गावांमध्ये विरोध करणारे काही लोक देखील या स्थितीला कारणीभूत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिन सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांविषयी सरकारला जास्त चिंता आहे. आम्ही त्यावर उपाय काढू. नियमित विद्यालये किंवा वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही. त्याविषयी यापुढे निर्णय होईल. सध्या नेटवर्कची समस्या गावांमध्ये वगैरे येते, कारण मोबाईल टॉवर उभे राहत होते तेव्हा त्या टॉवरना लोक विरोध करत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा राज्याच्या सीमा सील करा अशी मागणी विरोधक करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की सीमा सिल करा असे सांगणो सोपे असते. गोमंतकीयांनाच दुसऱ्या ठिकाणहून गोव्यात यायचे असते. सिल केल्या तर तेही गोव्यात येऊ शकणार नाहीत. जेव्हा सीमा सिल होत्या तेव्हा भाजी व जीवनावश्यक वस्तू येत नाहीत म्हणून जे विरोध करत होते तेच आता सीमा सिल करा अशी मागणी करतात.

सरकारने खर्चात कपात सुरू करावी अशी मागणी जे करत होते, तेच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजना बंद केली म्हणून टीका करतात. खर्च कपातीसाठीच्या उपाययोजनांचाच तो एक भाग आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक खासगी उद्योगांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापले, त्यांना कामावरून कमी केले हे सर्वानी लक्षात ठेवावे. गोव्याच्या सीमेवर पोलिस व आरोग्य कर्मचारी हे दोन्ही घटक चोवीस तास असतात. सीमेवर पहारा आहे. कोरोनाची लक्षणो दाखविणाऱ्यांची चाचणी होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा स्वयंपूर्ण करूया: मुख्यमंत्री

दरम्यान, गोवा क्रांतीदिनाच्यानिमित्ताने आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाराला राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पचक्र वाहिले. हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. राममनोहर लोहिया, लवंदे, मिनेङिास ब्रागांझा आदी अनेकांनी त्याग केला. त्यांच्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी व गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आजच्या युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.

राममनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांना लढण्यासाठी स्फुर्ती दिली. पंतप्रधान मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवूया असे म्हटले आहे. आम्ही त्याचप्रमाणो गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया, यासाठी सरकारला लोकसहभागाची व युवकांच्या योगदानाची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणStudentविद्यार्थीPramod Sawantप्रमोद सावंत