एक नव्हे, दोन मंत्री
By Admin | Updated: July 20, 2015 01:07 IST2015-07-20T01:07:48+5:302015-07-20T01:07:58+5:30
मडगाव : जैका प्रकल्पाचे काम मिळविण्यासाठी सहा कोटींच्या लाच प्रकरणात काँग्रेस सरकारच्या दोघा मंत्र्यांचा सहभाग आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे सांगितले

एक नव्हे, दोन मंत्री
मडगाव : जैका प्रकल्पाचे काम मिळविण्यासाठी सहा कोटींच्या लाच प्रकरणात काँग्रेस सरकारच्या दोघा मंत्र्यांचा सहभाग आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे ते म्हणाले. येथे रविवारी (दि.१९) भाजप कार्यकर्ता संमेलनात संरक्षणमंत्र्यांनी जैकाच्या भ्रष्टाचारासंबंधीच्या मुद्द्यालाही स्पर्श केला. कोणत्या बंगल्यात या कंत्राटासंबंधी बोलणी चालू होती? त्यावेळच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी ही रक्कम फुटबॉलकडे वळविली की स्वित्झर्लंडमध्ये ठेवली? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
केंद्र सरकार आणि जपान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोव्यात २००३ पासून पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक शेकडो कोटींची कामे जैका प्रकल्पांतर्गत राबविली जात आहेत. आॅगस्ट २०१० मध्ये अशाच कामांसाठी जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जर या अमेरिकेतील न्यू जर्सीस्थित सल्लागार कंपनीने गोव्याच्या मंत्री व अधिकाऱ्यांना सहा कोटी रुपयांची लाच (पान २ वर)