मये येथे एकावर खुनी हल्ला
By Admin | Updated: November 27, 2015 01:28 IST2015-11-27T01:28:04+5:302015-11-27T01:28:14+5:30
डिचोली : मये पंचायत क्षेत्रात चिमुलवाडा येथे एका बेकायदा बांधकामाच्या पाहणीसाठी सरपंच, सचिव, पंचायत सदस्य गेले

मये येथे एकावर खुनी हल्ला
डिचोली : मये पंचायत क्षेत्रात चिमुलवाडा येथे एका बेकायदा बांधकामाच्या पाहणीसाठी सरपंच, सचिव, पंचायत सदस्य गेले असता तक्रारदार हरिश्चंद्र मयेकर याने संजय मयेकर यांच्यावर कटरच्या साहाय्याने खुनी हल्ला केल्याची तक्रार वृंदा मयेकर यांनी पोलिसांत नोंदवली आहे.
या हल्ल्यात संजय मयेकर गंभीर जखमी असून म्हापसा इस्पितळात उपचार चालू आहे. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, चिमुलवाडा येथे बेकायदा बांधकामाबाबत हरिश्चंद्र मयेकर यांनी वृंदा मयेकर यांच्याविरोधात गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथक पाहणीस गेले होते. सरपंच, सचिव, पंचसदस्य तसेच तक्रारदार हरिश्चंद्र मयेकर, वृंदा मयेकर, काशीनाथ मयेकर, संजय मयेकर उपस्थित होते. पाहणी सुरू असताना संजय मयेकर यांनी बेकायदा बांधकामाची तक्रार केली असल्यास दाखव, असे सांगतानाच हरिश्चंद्र याने कटर संजय यांच्या गळ्यावर मारला. तो तोंडावर बसल्याने गंभीर जखमी झाला. त्याला बारा टाके पडले आहेत. या घटनेने सर्वच हादरले. लागलीच संजयला डिचोली इस्पितळात प्राथमिक उपचार करून म्हापसा येथे हलवण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर हरिश्चंद्र मयेकर यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी ३२६ खाली गुन्हा दाखल केला असून कटर जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)