कळंगुटमध्ये दार्जिलिंगातील एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:38 IST2017-07-21T12:38:06+5:302017-07-21T12:38:06+5:30

कळंगुटमध्ये दार्जिलिंगातील एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

One killed in Darjeeling in Kalangut | कळंगुटमध्ये दार्जिलिंगातील एकाचा खून

कळंगुटमध्ये दार्जिलिंगातील एकाचा खून

ऑनलाइन लोकमत

म्हापसा, दि. 21- बागा-कळंगुट येथील सुप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या गटात झालेल्या वादावादीतून पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगातील एका व्यक्तीचा खून करण्यात आला. या प्रकरणी नागपुरातील संतोष कमलसिंग याला अटक करण्यात आली आहे.
 
उत्तर गोव्यातील कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी दोघांत झालेल्या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. त्यानंतर कमलसिंग याने मयत राकेश राय याच्यावर सूऱ्याने शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. त्यात राय हा जबर जखमी झाला. त्याला लगेचच उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दळवी यांनी लोकमतला दिली. घटनेनंतर चत्तर-नागपुरातील संतोष कमलसिंग याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: One killed in Darjeeling in Kalangut